Devendra Fadanvis : मुंबईच्या पायाभूत विकासाला मिळणार ‘ऑस्ट्रिया’चे तांत्रिक बळ

एमएमआरडीए आणि ऑस्ट्रियामध्ये सामंजस्य करार; मुख्यमंत्र्यांनी दिले महाराष्ट्रात गुंतवणुकीचे निमंत्रण


मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता ऑस्ट्रियाचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि ऑस्ट्रियाचे केंद्रीय मंत्री वोल्फगँग हॅटमनसडॉर्फर यांच्यात झालेल्या बैठकीत धोरणात्मक सहकार्यासाठीच्या आशयपत्राचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आभासी माध्यमातून संवाद साधत ऑस्ट्रियन कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे निमंत्रण दिले.



वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’च्या मुख्यालयात ऑस्ट्रियाच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात भारतातील ऑस्ट्रियाचे राजदूत रॉबर्ट झिश्ग यांच्यासह शिक्षण, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टात जागतिक भागीदारी महत्त्वाची असून, ऑस्ट्रियाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नैपुण्य मुंबईच्या विकासाला गती देईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.



स्वाक्षरी करण्यात आलेल्या आशयपत्रानुसार, प्रामुख्याने भूमिगत पायाभूत सुविधांमधील प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास, नागरी दळणवळण क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रकल्पांमध्ये भागिदारी अशा बाबतीत दोन्ही बाजूंकडून सहकार्य केले जाणार आहे.



अटल सेतूची भुरळ


या भेटीदरम्यान ऑस्ट्रियन मंत्र्यांनी ‘अटल सेतू’ला भेट देऊन तिथल्या कामाच्या दर्जाची पाहणी केली. विशेष म्हणजे, या दौऱ्यात त्यांनी आपत्कालीन सेवांची कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक तपासणी केली. या तपासणीत यंत्रणेची तत्परता पाहून मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. "मुंबईतील पायाभूत सुविधांची व्याप्ती जागतिक दर्जाची असून ती थक्क करणारी आहे," अशा शब्दांत हॅटमनसडॉर्फर यांनी कौतुक केले.


दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेत मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर अनेक देश एमएमआरडीएसोबत काम करण्यास उत्सुक आहेत. टनेलिंग, मोबिलिटी आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत ऑस्ट्रियासोबतचे सहकार्य मैलाचा दगड ठरेल. एमएमआरडीए आता आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी एक सक्षम व्यासपीठ म्हणून ओळखले जात आहे, ही अभिमानाची बाब आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.