Mumbai Live Concert Drug : मुंबई हादरली! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मृत्यूचा थरार; ड्रग ओव्हरडोसमुळे २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान (Mumbai Live Concert Drug) घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात ड्रग ओव्हरडोस झाल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कॉलेज तरुणांपर्यंत ड्रग्जचे जाळे पोहोचले आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.



आणखी एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत :


मृतांमध्ये एक तरुण आणि एक तरुणी असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आणखी एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विशेषतः कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.



५ जणांना अटक :


या प्रकरणी वनराई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इव्हेंटशी संबंधित एका व्यक्तीचाही समावेश असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. तसेच १३ एप्रिल रोजी नेस्को सेंटरच्या इव्हेंट्स अँड एक्झिबिशन्स विभागातील व्हाइस प्रेसिडेंटलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु :


प्राथमिक तपासानुसार, संबंधित विद्यार्थ्यांना ड्रगचे सेवन करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमका कोणता ड्रग वापरण्यात आला आणि तो कोणी पुरवला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिसांकडून याचा सखोल तपास सुरू आहे.


या घटनेमुळे मुंबईतील इव्हेंट्सच्या सुरक्षेवर आणि ड्रग्ज नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरुण पिढीच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने