Bihar CM Samrat Choudhary: बिहारच्या नवीन राजकीय पर्वाची सुरुवात; सम्राट चौधरी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडत सम्राट चौधरी (Bihar CM Samrat Choudhary) यांनी राज्याचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सय्यद अता हसनैन यांनी पाटणा येथील लोक भवनात त्यांना शपथ दिली. त्यांच्या नियुक्तीमुळे बिहारमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा आहे.


सम्राट चौधरी हे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री ठरले असून एनडीए सरकारमध्ये जेडीयू कोट्यातून विजय चौधरी आणि विजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.



साध्या कुटुंबातून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास :


१६ नोव्हेंबर १९६८ रोजी मुंगेर जिल्ह्यात जन्मलेल्या सम्राट चौधरी यांचा राजकीय वारसा त्यांच्या कुटुंबातूनच आला. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे देखील राजकारणात सक्रिय होते. शिक्षणानंतर त्यांनी १९९० मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला.



राजकारणातील मजबूत पायाभरणी :


सम्राट चौधरी यांनी १९९९ मध्ये राबडी देवी यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत आपली ओळख मजबूत केली. २०१४ मध्ये जितन राम मांझी यांच्या मंत्रिमंडळातही त्यांनी नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून काम केलं.



भाजपमधील वाढता प्रभाव :


२०१८ मध्ये त्यांची भाजपच्या बिहार उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि २०२३ मध्ये ते प्रदेशाध्यक्ष झाले. ओबीसी चेहरा म्हणून त्यांनी राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी मोठी भूमिका बजावली. या राजकीय प्रवासात सम्राट चौधरी अनेकदा वादातही सापडले. विधानसभेतील वाद, तसेच नितीश कुमार यांच्यावर केलेल्या टीकांमुळे ते सतत चर्चेत राहिले.



पुढील आव्हाने मोठी :


मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आता सम्राट चौधरी यांच्यासमोर राज्यातील विकास, सामाजिक समतोल आणि राजकीय स्थिरता राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.


एकूणच, सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण