IPL 2026 RCB vs CSK : 'डोसा-इडली-सांबर-चटणी' गाण्यावरून संतापली चेन्नई; केली बीसीसीआयकडे तक्रार

- जाणून घ्या नेमकं प्रकरण काय


आयपीएल २०२६ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामना मैदानापुरताच मर्यादित राहिला नाही, तर आता तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ५ एप्रिल रोजी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आलेल्या एका गाण्यावरून सीएसकेने थेट बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.


सीएसकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या डावापूर्वी “डोसा, इडली, सांबार, चटणी” हे गाणे वाजवून संघाची खिल्ली उडवण्यात आली. यामुळे खेळाडूंचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



डीजेच्या वर्तनावरही आक्षेप :


वृत्तानुसार, आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीएसकेची तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून, या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनीही नाराजी व्यक्त करत सांगितले की, स्टेडियममधील डीजेचे काम प्रेक्षकांचे मनोरंजन करणे असते, परंतु खेळाडूंवर टिप्पणी करणे किंवा त्यांची चेष्टा करणे हे खेळाच्या भावनेविरुद्ध आहे.



‘डोसा-इडली’ गाण्यावरून आधीही वाद :


हे गाणे याआधीही चर्चेत राहिले आहे. संगीतकार गणा अप्पू यांच्याशी संबंधित असलेले हे गाणे RCB-CSK सामन्यांदरम्यान वारंवार वादाचे कारण ठरले आहे. गेल्या वर्षी यष्टिरक्षक जितेश शर्मा याने हे गाणे गातानाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता.



‘सदर्न डर्बी’त वाढता तणाव :


चेन्नई आणि बंगळूर यांच्यातील सामने आता ‘सदर्न डर्बी’ म्हणून ओळखले जातात आणि ही स्पर्धा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, 2024 पासून RCB ने CSK विरुद्ध सलग चार सामने जिंकले आहेत, ज्यामुळे दोन्ही संघांमधील तणाव आणखी वाढला आहे.



BCCI च्या निर्णयाकडे लक्ष :


या संपूर्ण प्रकरणावर आता BCCI आणि IPL गव्हर्निंग कौन्सिल काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादावर पुढे काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून