Sion Flyover : शीव उड्डाणपूलाचे काम १५जुलै २०२६पर्यंत पूर्ण करा, आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मलजल प्रक्रिया केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण असून, जुलै २०२७ पर्यंत धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होईल, याची दक्षता घ्यावी. शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम १५ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.


महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांनी गुरुवार १६ एप्रिल २०२६ शहर विभागातील विविध विकास कामांची प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्‍यात धारावी येथील ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र, शीव (सायन) येथील रेल्‍वेमार्गावरील उड्डाणपूल, शीव येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे, चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानक परिसरात पावसाचे पाणी साचू नये म्‍हणून पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाने केलेल्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आदींचा समावेश आहे. या पाहणीवेळी त्‍यांनी विविध निर्देश दिले. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यावेळी उपस्थित होते. या पाहणी दौ-यास महानगरपालिकेचे उपायुक्‍त (आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्‍त (विशेष) विनायक विसपुते, उपायुक्‍त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, प्रमुख अभियंता (रस्‍ते) मंतय्या स्‍वामी, प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्या) कल्‍पना राऊळ यांच्‍यासह संबंधित अधिकारी तसेच अभियंते उपस्थित होते.


धारावी मलजल प्रक्रिया केंद्र : मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्यावतीने धारावी येथे ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. भिडे यांनी या प्रकल्‍पाची पाहणी केली. धारावी मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची भौतिक प्रगती ६५ टक्के झाली आहे. जुलै २०२७ मध्‍ये हा प्रकल्‍प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. मुंबईत एकूण ७ मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्‍याची प्रक्रिया सुरू असून धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्र सर्वात कमी जागेत बांधले जात आहे. कोणत्‍याही परिस्थितीत जुलै २०२७ मध्‍ये धारावी मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होईल, याची दक्षता बाळगण्‍याचे निर्देश भिडे यांनी दिले.


शीव (सायन) उड्डाणपूल : शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्‍प स्‍थळाची महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात प्रकल्प कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. महानगरपालिका पूल विभाग आणि रेल्‍वे विभागांनी परस्‍पर समन्‍वय ठेवून दिनांक १५ जुलै २०२६ पर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण होतील याची खबरदारी घ्‍यावी, असेही भिडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक