Skill Centre : राज्यात लवकरच १०० महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू होणार

मुंबई : कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र प्रथम टप्प्यात शंभर केंद्र सुरू करण्यात येणार आहेत आगामी काळात राज्यात या कौशल्य विकास केंद्रांची एक हजार पर्यंत ही संख्या वाढविणार आहोत. ही योजना मुंबई महापालिका क्षेत्रात ही मुंबई शहर व उपनगर मध्ये राबविण्यात येणार आहे.महानगरपालिकेमार्फत या कौशल्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली आहे अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.


मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचीही भेट त्यांनी घेतली. या भेटीदरम्यान मुंबईच्या विविध समस्यांसह तरुणांच्या रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे या योजनेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासोबत कौशल्याची सांगड घालण्यात येणार आहे.झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आवश्यक असलेले कौशल्य शिकविण्यात येतील. पदवी सोबत कौशल्य अवगत असेल तरच रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतील. हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रॅम्प तयार करणे, सायन येथील 'अम्मान देखनी' संस्थेजवळील डीपी रोडवर झालेले अतिक्रमण हटवून तो रस्ता रहिवाशांसाठी मोकळा करावा, याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.मुंबईतील पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून काम करतील, असा विश्वास यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर