Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातवर ED-IT ची मोठी कारवाई; बेनामी व्यवहारांचे धक्कादायक पुरावे उघड

नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat याच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आयकर विभागाने केलेल्या संयुक्त धाडीत कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचे ठोस पुरावे समोर आले आहेत. फसवणूक आणि खंडणीतून मिळालेला पैसा जमिनींमध्ये गुंतवून मोठे आर्थिक जाळे उभारल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.



‘कच्च्या नोंदी’तून उघड झाले व्यवहार :


तपासादरम्यान खरातच्या घरातून मालमत्तेच्या ‘कच्च्या नोंदी’ असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली. अधिकृत नोंदणी टाळून केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करून अनेक जमिनी स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. कर चुकवण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी हा मार्ग वापरला जात असल्याचा संशय आहे.



१० कोटींच्या मालमत्तेचे धागेदोरे :


या धाडीत १० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त झाली आहेत. मनी लाँड्रिंगसाठी ‘शेल कंपन्या’ वापरल्याचा संशय असून, त्याद्वारे व्यवहारांची साखळी लपवली गेल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. बँक खाते, CDR आणि आयकर रिटर्नची सखोल छाननी सुरू आहे.



पत्नीच्या जामीनावर सुनावणी पुढे ढकलली :


या प्रकरणात अशोक खरातला अटक करण्यात आली असून, त्याची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू असून ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवणार?’ एकनाथ शिंदेंनी सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात