Mumbai : ड्रग्जना आळा घालण्यासाठी सहपालकमंत्री लोढा अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई : गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या (ड्रग्स) अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा एकदम अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यात सुरू असलेली ड्रग्जविरोधी मोहीम मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रभावीरित्या राबवण्यासाठी त्यांनी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी संध्याकाळी चार वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच उत्पादन शुल्क, महापालिका आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. सार्वजनिक कार्यक्रम, प्रदर्शन आणि मोठ्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यात यावी, तसेच अमलीपदार्थ विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या उद्देशाने ही बैठक असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.


गुप्तचर यंत्रणा आणखी मजबूत करणे, तरुणाईत जनजागृती करणे, पोलिसांच्या सहकार्याने ड्रग्ज विक्रेते आणि निर्माते तसेच ड्रग्ज तस्कर यांना गजाआड करणे ही कामं करून ड्रग्जना आळा घालण्याच्या प्रभावी उपाययोजना राबवण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली.


मुंबईतल्या काही विशिष्ठ भागात बांगलादेशी आणि रोहिंग्याची मोठ्या प्रमाणात घुसखोरी वाढली आहे, त्यातूनही समाजविघातक शक्ती असल्या घटनांना जबाबदार असल्याचे नाकारता येत नाही. यादृष्टीनेही तपास पुढे गेला पाहिजे, असे ठाम मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.