Health News : रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा सीएसआरच्या माध्यमातून, आयुक्तांनी दिले आरोग्य विभागाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : एमआरआय, सीटी स्कॅन यासारख्या चाचण्यांसाठी मोठ्या आणि अवजड उपकरणांच्या वापरासाठी भूमिगत कक्ष निर्माण करता येतील का, याचाही आढावा घ्या. शस्त्रक्रिया विभागाच्या ठिकाणी अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व’ महानगरपालिकेच्या माध्यमातून तसेच (सी.एस.आर.) अंतर्गत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशाही सूचना त्यांनी याप्रसंगी दिल्या. तसेच रुग्णालय पुनर्विकासअंतर्गत उपलब्ध जागेचा अधिकाधिक वापर करत रुग्णांना आणि आरोग्य यंत्रणेला होईल, यादृष्टीने आराखडा तयार करावा,असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. आश्विनी भिडे यांनी आरोग्य विभागाला दिले.


सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय येथील विविध वैद्यकीय कक्षांच्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी शुक्रवारी १७ एप्रिल २०२६ रोजी भेट दिली. रुग्णालय पुनर्विकास, विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य सुविधांवर येणारा ताण कमी करणे यासारख्या विषयांच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी, रूग्णालय क्षमतावाढीच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेल्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत रुग्णांच्या सुविधेच्या अनुषंगाने विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, यादृष्टाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. विविध विभागांचे शस्त्रक्रिया कक्ष संकूल (इन्टिग्रेटेड ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स), रक्तचाचणी प्रयोगशाळा या एकाच ठिकाणी असल्याने रुग्णांची वेळेची बचत होईल. त्यादृष्टीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये नियोजन करण्यात यावे.


महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, अपघातग्रस्तांसाठी ‘पीएम-राहत’ योजना यासारख्या योजनांचा लाभ रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांना करून द्यावा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या धर्तीवर इतर योजनांसाठी (एम्पॅनेलमेंट) वैद्यकीय उपचारांसाठी शुल्क आकारणी करावी. त्याचा फायदा रुग्णालयाच्या महसूल वाढीसाठी कसा होईल, यादृष्टीने प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिल्या.


केईएमवरील गर्दी करण्यासाठी दवाखान्यांना प्राधान्य


केईएम रुग्णालयावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी येणारा ताण पाहता वैद्यकीय सुविधा नजीकच्या दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात याव्यात. केईएम रुग्णालयाने नजीकच्या दवाखान्यांच्या ठिकाणी आरोग्य सुविधांसाठीचे रुग्ण पाठवावेत, त्यामुळे प्राथमिक सेवेवर येणारा ताण कमी होईल, अशा सूचना आश्विनी भिडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.


आरोग्य सेवांसाठी उपनगरीय रुग्णालये, प्रसुतीगृह आणि दवाखाने याठिकाणी अधिक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच अत्यावश्यक सुविधांसाठी प्रमुख रूग्णालये सेवा देण्यासाठी सक्षम व्हावी, याअनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.


आरोग्य यंत्रणेमध्ये चार प्रमुख रूग्णालये आणि १६ उपनगरीय रुग्णालयांवर येणारा ताण पाहता रुग्ण हस्तांतरीत करण्यासाठी लिंकेज सिस्टिम पुनर्जिवित करावी, अशा सूचनाही आयुक्त आश्विनी भिडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर