Block : प्लॅटफॉर्म विस्तारासाठी ठाणे आणि डोंबिवलीत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील अर्थात मेन लाईनवरील ठाणे येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ तसेच डोंबिवली येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १ए, १ आणि २ च्या अप आणि डाउन धिम्या मार्गाच्या विस्तारासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉक १८ आणि १९ एप्रिल दरम्यान म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री घेतला जाईल.


ब्लॉकची तारीख: १८ आणि १९ एप्रिल, २०२६ (शनि-रविवार रात्री)
ब्लॉकचा कालावधी: १९.०४.२०२६ रोजी रात्री १२ ते १०.०० वाजेपर्यंत
ब्लॉक विभाग: मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली अप आणि डाउन धीमा मार्ग.


ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे असतील:


उपनगरीय गाड्यांचे मार्गांतरण: शनिवार १८ एप्रिल रोजी रात्री ११.२६ ते ११.५२ वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या आणि दिनांक १९ एप्रिल रोजी ०३.२३ ते ०९.५५ वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप धिम्या लाईन सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या ठाकुर्ली व कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत.


दिनांक १८ एप्रिल रोजी रात्री १०.४९ वाजता परळ येथून सुटणाऱ्या ते दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री १२ वाजून १२ वाजेपर्यंत तसेच दिनांक १९ एप्रिल रोजी ०४.४५ वाजता विद्याविहार येथून सुटणाऱ्या ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.०५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कोपर व ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.


ब्लॉक कालावधीत, १९ एप्रिल रोजी पहाटे ०५.४५ वाजल्यापासून ते सकाळी ०९.५८ वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लाईन सेवा त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील.


दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ०५.२० ते ०९.२० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाउन जलद लाईन सेवा ब्लॉक कालावधीत त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.


ब्लॉक कालावधीत गंतव्यस्थानी येणाऱ्या/जाणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल आणि एक्सप्रेस गाड्या ६ व्या लाईनवर वळवण्यात येतील आणि ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून जाणाऱ्या डाउन मेल आणि एक्सप्रेस गाड्या विद्याविहार आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५ व्या लाईनवर वळवण्यात येतील.


१८ एप्रिल रोजी उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन (Short Termination)*


कुर्ला येथे


CSMT-कल्याण लोकल, CSMT वरून १०.०४ वाजता सुटणारी


CSMT-ठाणे लोकल, CSMT वरून ११.१२ वाजता सुटणारी


ठाणे येथे


परेल-कल्याण लोकल, परेल वरून १०.०३ वाजता सुटणारी


डोंबिवली-CSMT लोकल, डोंबिवली वरून ०९.०० आणि १०.१८ वाजता सुटणारी


कल्याण येथे


टिटवाळा-ठाणे लोकल, टिटवाळा वरून ११.१४ वाजता सुटणारी


आसनगाव-ठाणे लोकल, आसनगाव वरून ११.०८ वाजता सुटणारी


* १९ एप्रिल रोजी उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन (Short Termination)*


कुर्ला येथे


CSMT-ठाणे लोकल, CSMT वरून रात्री १२.२४ वाजता सुटणारी


१९ एप्रिल रोजी उपनगरीय गाड्यांची सेवा अंशतः सुरू होणाऱ्या स्थानकांवरून (Short Origination)


कुर्ल्याहून (Ex Kurla)


ठाणे-CSMT लोकल, जी ठाण्याहून सुटणार होती:


• ०४.४८ वाजता, ती आता कुर्ल्याहून ०५.१६ वाजता सुटेल


• ०५.०८ वाजता, ती आता कुर्ल्याहून ०५.२५ वाजता सुटेल


• ०५.३७ वाजता, ती आता कुर्ल्याहून ०६.०३ वाजता सुटेल


• ०५.४७ वाजता, ती आता कुर्ल्याहून ०६.१४ वाजता सुटेल


• ०९.५७ वाजता, ती आता कुर्ल्याहून १०.२५ वाजता सुटेल


ठाण्याहून (Ex Thane)


परेल-डोंबिवली लोकल, जी परेलहून ०९.४८ वाजता सुटणार होती, ती आता ठाण्याहून १०.२८ वाजता सुटेल.


CSMT-कल्याण लोकल, जी CSMT वरून ०९.३७ वाजता सुटणार होती, ती आता ठाण्याहून १०.३४ वाजता सुटेल.


CSMT-डोंबिवली लोकल, जी CSMT वरून १०.३४ वाजता सुटणार होती, ती आता ठाण्याहून ११.३३ वाजता सुटेल.


कल्याण-CSMT लोकल, जी कल्याणहून ०९.४३ वाजता सुटणार होती, ती आता ठाण्याहून १०.१६ वाजता सुटेल.


टिटवाळा-CSMT लोकल, जी टिटवाळ्याहून १०.२० वाजता सुटणार होती, ती आता ठाण्याहून ११.०७ वाजता सुटेल.


मुंब्र्याहून (Ex Mumbra)


ठाणे-कर्जत लोकल, जी ठाण्याहून ०५.०० वाजता सुटणार होती, ती आता मुंब्र्याहून ०५.११ वाजता सुटेल.


ठाणे-कर्जत लोकल, जी ठाण्याहून ०५.३५ वाजता सुटणार होती, ती आता मुंब्र्याहून ०५.४६ वाजता सुटेल.


CSMT-अंबरनाथ लोकल, जी CSMT वरून ०५.१६ आणि ०५.४० वाजता सुटणार होती, ती आता अनुक्रमे मुंब्र्याहून ०६.२२ आणि ०६.४६ वाजता सुटेल. विद्याविहारहून ०६.४९ वाजता सुटणारी विद्याविहार-अंबरनाथ लोकल मुंब्राहून ०७.२३ वाजता सुटेल.


ठाणेहून १०.०६ वाजता सुटणारी ठाणे-कल्याण लोकल मुंब्राहून १०.१७ वाजता सुटेल.


CSMT-डोंबिवली लोकल, जी CSMT वरून ०९.१६ वाजता सुटणार होती, ती मुंब्राहून १०.२२ वाजता सुटेल.


कल्याणहून (Ex Kalyan)


ठाणेहून ०५.२७ वाजता सुटणारी ठाणे-कर्जत लोकल कल्याणहून ०५.५९ वाजता सुटेल.


ठाणेहून ०५.४६ वाजता सुटणारी ठाणे-आसनगाव लोकल कल्याणहून ०६.१८ वाजता सुटेल.


CSMT-आसनगाव लोकल, जी CSMT वरून ०५.१२ वाजता सुटणार होती, ती कल्याणहून ०६.३९ वाजता सुटेल.


ठाणेहून ०८.५६ वाजता सुटणारी ठाणे-टिटवाळा लोकल कल्याणहून ०९.२८ वाजता सुटेल.


शेवटची आणि पहिली लोकल


डाउन धिम्या मार्गा वरील ब्लॉकच्या आधीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराजटर्मिनस-खोपोली लोकल असेल, जी दिनांक १८ एप्रिल रोजी रात्री १०.२८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.
अप धिम्या मार्गावरील ब्लॉकच्या आधीची शेवटची लोकल कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल असेल, जी दिनांक १८ एप्रिल रोजी रात्री ११.१५ वाजता कल्याण येथून सुटेल.


डाउन धिम्या मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण लोकल असेल, जी दिनांक १९ एप्रिल रोजी ०९.२६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.


अप धिम्या मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली लोकल टिटवाळा-परेल लोकल असेल, जी दिनांक १९ एप्रिल रोजी १०.०९ वाजता कल्याण येथून सुटेल.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून