ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया आता पुन्हा मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रक्रियेला ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील रिक्षा, टेम्पो आणि स्कूलबससह सुमारे १५ लाख व्यावसायिक वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


राज्यात राबविण्यात येत असलेल्या अद्ययावत 'एटीएस' प्रणालीमुळे गेल्या काही काळापासून व्यावसायिक वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण पूर्णतः बंद झाले होते. विशेषतः राज्यातील ११ महत्त्वाच्या आरटीओ क्षेत्रांतील कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला होता. परवाना नूतनीकरण रखडल्याने रिक्षाचालकांपासून ते स्कूलबस मालकांपर्यंत सर्वांनाच कायदेशीर अडचणींना आणि आर्थिक दंडाला सामोरे जावे लागत होते.


या समस्येचे गांभीर्य ओळखून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने नितीन गडकरी यांना पत्र लिहून एटीएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत नूतनीकरण प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या विनंतीचा सकारात्मक विचार करत केंद्राने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.


कुणाला होणार फायदा?


- रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मुदत संपलेल्या परवान्यांमुळे होणारी कारवाई टळणार.


- शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना स्कूलबस आणि टेम्पो परवाना प्रक्रियेतील अडथळा दूर.


- ११ आरटीओ क्षेत्रातील रखडलेली हजारो प्रकरणे निकाली काढण्यास मिळणार वेळ.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.