Priyanka Chaturvedi : महिला आरक्षणाविरोधात मतदान केल्याने ‘उबाठा’ गटात पहिले बंड

प्रियांका चतुर्वेदी पक्षांतराच्या तयारीत; पक्षाच्या भूमिकेवर उघडपणे केली टीका


मुंबई : नारी शक्ती वंदन विधेयकावरून संसदेत घडलेल्या अभूतपूर्व घडामोडींनंतर आता त्याचे पडसाद उबाठा गटात उमटण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाने लोकसभेत घेतलेल्या भूमिकेला थेट आव्हान देत माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बंडाचे निशाण फडकवले असून, त्या लवकरच पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



महिला आरक्षणाशी संबंधित १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर संसदेत मतदान झाले. या विधेयकाला २९८ मते मिळाली, तर २३० सदस्यांनी विरोधात कौल दिला. आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने हे विधेयक नामंजूर झाले. उबाठा गटाच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. मात्र, प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाची ही अधिकृत भूमिका झुगारून देत विधेयकाचे उघड समर्थन केले आहे.



"महिला आरक्षण विधेयक मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत दुःखद दिवस आहे. संसदेत किंवा विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवू पाहणाऱ्या महिलांची यामुळे मोठी निराशा झाली आहे. मी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असून स्वतःला इतरांच्या सोयीनुसार बदलणार नाही. माझी भूमिका कुणाला मान्य नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे," अशा तिखट शब्दांत चतुर्वेदी यांनी आपले मत मांडले.



भाजप प्रवेशाची चर्चा


चतुर्वेदी यांच्या या भूमिकेमुळे उबाठा गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. नुकताच प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून, त्यांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीने शरद पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने चतुर्वेदी यांची संधी हुकली. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न करूनही अंतिम निर्णयावेळी त्यांना डावलण्यात आल्याने त्या आधीपासूनच नाराज होत्या. लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने