Pune Airport : पुणे विमानतळावरून ९४ विमानांच्या फेऱ्या अचानक रद्द; जाणून घ्या कारण

पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टीची शुक्रवारी रात्री नुकसान झाले. भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट चे हार्श लँडिंग झाल्यामुळे धावपट्टीवर आग पसरली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे विमानतळावरून तब्बल ९४ विमान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.



नेमकी घटना काय?


भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट विमानाचे लँडिंग करत असताना विमानाचा गिअर बिघडला असल्याने धावपट्टीवर विमान अतिशय जोरात आदळले आणि सगळीकडे आगीचे लोट पसरले. या हार्श लँडिंगमुळे धावपट्टीच्या पृष्ठभागाचे नुकसान झाले. सुदैवाने पायलट सुरक्षित आहे, मात्र धावपट्टी खराब झाल्याने ती इतर विमानांच्या बाबतीत धोकदायक ठरू शकते याच गोष्टीची दक्षता घेत उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.



या कंपन्यांहूची विमाने रद्द ?


धावपट्टी बंद असल्याने विविध विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


इंडिगो : सर्वाधिक फटका इंडिगोला बसला असून ३७ विमाने रद्द करण्यात आली आहेत.


एअर इंडिया : ६ विमाने रद्द
एअर इंडिया एक्सप्रेस : १० विमाने रद्द
स्पाइसजेट : ३ विमाने रद्द
याव्यतिरिक्त इतर अनेक विमाने सुरत, गोवा आणि मुंबईकडे वळवण्यात आली आहेत.



इंडिगोचे प्रवाशांसाठी सोयी


विमान रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले. याच पार्श्वभूमीवर इंडिगोने प्रवाशांना विमानाचे अपडेट्स देत असून ज्यांची विमान रद्द झाली आहेत, ते प्रवासी प्लॅन बी अंतर्गत फ्लाईट निवडू शकतात. किंवा पूर्ण परतावा घेऊ शकतात. इंडिगोने ट्विट करत याची संपूर्ण माहिती दिली आहे.


मुरलीधर मोहोळ काय म्हणाले


शिवाय केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत धावपट्टी लवकरात लवकर सुरळीत करू काम युद्धपातळीवर सुरु आहे सुरक्षित धावपट्टी होईपर्यंत नागरिकांना आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.