Ashok Kharat Case : SIT च्या तपासामुळे भोंदूबाबा खरातच्या अडचणीत वाढ! पोलीस कोठडीत झाली पुन्हा वाढ

नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat अशोक खरात याच्याविरोधात एकामागून एक गुन्हे दाखल होत असून, प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महिला अत्याचार, फसवणूक, अमली पदार्थांचा वापर आणि धार्मिक भावना दुखावण्यासारखे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.


अशातच आता नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat याच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



विशेष म्हणजे ही सुनावणी ऑनलाईन माध्यमातून झाली. यावेळी सरकारी वकिलाकडून खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. पुढे सरकारी वकिलाने आपली बाजू मांडताना सांगितले की, खरातची गुन्हा करण्याची पद्धत जरी एकसारखी असली तरीही पीडित महिला प्रत्येकवेळी वेगवेगळी होती. मात्र महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन आणि फसवणूक करून अत्याचार करण्यात आले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील द्रव्यांचा वापर आणि संपूर्ण कटाचा तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.



महिनाभरातील घटनाक्रम :


या प्रकरणात गेल्या महिनाभरात अनेक घडामोडी घडल्या असून त्या खालील प्रमाणे आहेत.
१७ मार्च - रात्री उशिरा अशोक खरातला अटक
१८ मार्च - न्यायालयात हजर, ७ दिवसांची पोलीस कोठडी
२० मार्च - प्रकरण SIT कडे वर्ग
२२ मार्च - तीन महिलांच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल
२५ मार्च - अमली पदार्थांचा वापर आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप वाढले
२६ मार्च - ५ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद
३० मार्च - तिसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी
८ एप्रिल - आठ महिलांच्या तक्रारी, महत्त्वाचे पुरावे हाती
१३ एप्रिल - नाशिक, पुणे, शिर्डी येथे ED चे छापे
१५ एप्रिल - चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी
१८ एप्रिल - न्यायालयीन कोठडी
१९ एप्रिल - पाचव्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी


सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत असून, २३ एप्रिल रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Nitesh Rane: जिहादी मानसिकतेला बळ देऊ नका’!

मुंबई : ‘हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या आणि जिहादी मानसिकता बाळगणाऱ्यांना बळ देऊ नये,’ अशी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने