Mumbai News : ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगद्याच्या आराखड्यात बदल

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे बांधण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगद्याच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. आता हा बोगदा वानखेडे स्टेडियम येथे न संपता गिरगाव चौपाटीजवळ मफतलाल जलतरण तलाव येथे संपेल. ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह या ९ हजार कोटींच्या प्रकल्पाला महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे मंजुरी देण्यात आली होती; मात्र आता या प्रकल्पाचा सुधारित आराखडा प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. जुन्या आराखड्यानुसार बोगदा बांधल्यास तो वानखेडे स्टेडियम येथे संपेल. त्यामुळे मरिन ड्राइव्ह येथील क्वीन्स नेकलेस या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होईल. बांधकामादरम्यान मरिन ड्राइव्ह येथे होणारी वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण यांमुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या या परिसरातील वातावरण खराब होऊ शकते. हे टाळण्यासाठी बोगदा प्रकल्पाच्या संरेखनात बदल करण्याची मागणी मरिन ड्राइव्ह सिटीझन्स असोसिएशनने केली आहे. पूर्वमुक्त मार्ग आणि अटल सेतू यांच्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ऑरेंज गेट बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामुळे ४५ मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक