BMC : महापालिका आयुक्तांच्या भेटीनंतर अतिरिक्त आयुक्तांची रुग्णालयात धाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर आश्विनी भिडे यांनी महापालिका रुग्णालयाला भेटी देवून तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना रुग्णालयात जाण्याची इच्छा प्रकट झाली. अतिरिक्त आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी सोमवारी एम.व्ही.देसाई रुग्णालयाला भेटी देवून तेथील रुग्णांशी संवाद साधला आहे.


मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी २० एप्रिल २०२६ रोजी मालाड पूर्व परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या मनोहर वामन देसाई रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग आणि रुग्णालयातील विविध विभागांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या रुग्णांशीही संवाद साधला. त्याचबरोबर रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली.


डॉ विपिन शर्मा यांच्याकडे मागील अनेक महिन्यांपासून आरोग्य विभागचा पदभार असून आजवर या रुग्णलयांना कधीही त्यांनी भेटी दिल्या नाहीत.पण आयुक्तांनी आता भेटी देवून आढावा घेण्यास सुरुवात केल्यानंतरही त्यांनाही आता रुग्णालयात जाण्याची वेळ आली.


अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या या दौ-या दरम्यान त्यांच्या समवेत महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख डॉक्टर चंद्रकांत पवार हे देखील उपस्थित होते. डॉ. शर्मा यांनी आजच्या भेटीदरम्यान रुग्णालयातील यंत्रसामग्री, रुग्णवाहिका तसेच रुग्णालयाशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेऊन तेथील परिस्थिती बाबत संबंधितांशी सविस्तर चर्चा केली. तसेच डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय सेवा सुविधा देणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना डॉ. शर्मा यांनी आवर्जून निर्देशित केले की, रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा सुविधा देणारे संबंधित कर्मचारी या सर्वांनी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांशी अधिकाधिक सौहार्दपूर्ण पद्धतीने संवाद साधावा आणि रुग्णांचे समुपदेशन योग्य रीतीने करावे. रुग्णालयातील स्वच्छता व सेवा सुविधा याबाबत डॉ. शर्मा यांनी समाधान व्यक्त केले.


मनोहर वामन देसाई रुग्णालय हे मालाड पूर्व परिसरात असणारे महानगरपालिकेचे एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. १८० खाटांचे हे रुग्णालय सन १९७६ पासून मुंबईकरांना वैद्यकीय सेवा सुविधा देत आहे. या रुग्णालयाची बाह्य रुग्ण नोंदणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ८ ते ११ यादरम्यान सुरू असते, अशी माहिती देखील रुग्णालय प्रशासनाद्वारे या निमित्ताने कळविण्यात आली आहे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर