BMC News : सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागातील स्वच्छतेवर भर द्या, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्ते स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाले स्वच्छता, बस थांबे आदी ठिकाणच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी आज दिल्या आहेत. त्यांनी पश्चिम उपनगरातील ३ विभाग कार्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणांची आकस्मिक पाहणी केली.


अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज (दिनांक २० एप्रिल २०२६) पश्चिम उपनगरांतील एच पूर्व, पी उत्तर आणि पी दक्षिण या विभागांमधील विविध ठिकाणांना आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विभागांमधील परिसर स्वच्छता आणि नाले स्वच्छतेच्या कामांचा पाहणी केली. त्यानंतर त्यांनी 'एच पूर्व' विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे, 'पी उत्तर' विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी आणि 'पी दक्षिण' विभागाचे सहायक आयुक्त अनिरूद्ध कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनी संवाद साधला. या दूरध्वनी संवादा दरम्यान त्यांनी संबंधित सहाय्यक आयुक्त यांना विविध बाबींच्या अनुषंगाने निर्देश दिले आहेत.


पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. कंत्राटदाराने काढलेला ओला गाळ ४८ तासानंतरच त्याचे वहन होत आहे की नाही, याकडेही संबंधित अभियंत्यांनी प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. तसेच सहायक आयुक्तांनी संबंधित अभियंत्यांकडून या सर्व कामाचा दररोज आढावा घ्यावा, अशा सूचनाही डॉ. शर्मा यांनी आजच्या आकस्मिक पाहणीनंतर संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.


'पी दक्षिण' विभागातील दाजीवाडी भाजी मंडई, राणीसती मार्ग मंडी परिसरातील स्वच्छता कामांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच तिनही विभागातील उड्डाणपुलांखालील आणि परिसरातील कचरा हटवून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देशही शर्मा यांनी आजच्या आकस्मिक पाहणीनंतर दिले आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने