ETPL Abhishek Bachchan's Team : अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखालील ETPL ची ग्लासगो फ्रँचायझीची घोषणा; ख्रिस गेल आणि मुगाफी ग्रुपकडे संघाची मालकी

युरोपमधील पहिली आयसीसी-मान्यताप्राप्त T20 स्पर्धा ‘युरोपियन T20 प्रीमियर लीग’ (ETPL)ने आपल्या ग्लासगो-स्थित फ्रँचायझी ‘ग्लासगो मुगाफियन्स’ची अधिकृत घोषणा केली आहे. या संघाला मुगाफी ग्रुपचे संस्थापक भागीदार म्हणून पाठबळ असून, संघाची मालकी तन्शा बत्रा यांच्याकडे आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल हा सह-मालक आणि जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून संघाशी जोडला गेला आहे.


ईटीपीएलचे सह-मालक अभिषेक बच्चन यांनी या नव्या फ्रँचायझीचे स्वागत करताना सांगितले की, युरोपमध्ये क्रिकेटसाठी मोठी क्षमता असून, ही लीग नव्या प्रतिभेला व्यासपीठ देण्यासोबतच विविध बाजारपेठांना जोडण्याचे काम करेल.


ईटीपीएलचा पहिला हंगाम २६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२६ दरम्यान खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत ग्लासगो, ॲमस्टरडॅम, एडिनबर्ग, डब्लिन, बेलफास्ट आणि रॉटरडॅम या सहा शहरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांमध्ये एकूण ३३ सामने रंगतील.



मुगाफी ग्रुपचे सीईओ विपुल अग्रवाल यांनी सांगितले की, क्रिकेटची प्रेक्षकसंख्या झपाट्याने वाढत असून, युरोपमध्ये अशा प्रकारची लीग सुरू होणे ही मोठी संधी आहे.


संघाच्या मालक तन्शा बत्रा यांनीही ग्लासगोमधील स्थानिक क्रिकेटला व्यावसायिक व्यासपीठ मिळणार असल्याचे सांगितले. तर ख्रिस गेलने या नव्या प्रवासाबद्दल उत्साह व्यक्त करत, युरोपमध्ये क्रिकेटच्या विस्तारासाठी ही लीग महत्त्वाची ठरेल, असे म्हटले.


दरम्यान, ईटीपीएलमध्ये इतरही अनेक दिग्गजांचा सहभाग आहे. ॲमस्टरडॅम संघाला स्टीव्ह वॉ आणि जेमी ड्वायर यांचा पाठिंबा असून, बेलफास्ट संघात ग्लेन मॅक्सवेल, तर एडिनबर्ग संघात काईल मिल्स, नॅथन मॅककुलम आणि मिचेल सँटनर यांसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी आहेत.


ही लीग ‘क्रिकेट आयर्लंड’ आणि ‘रूल्स ग्लोबल’चा संयुक्त उपक्रम असून, ‘क्रिकेट स्कॉटलंड’ आणि ‘रॉयल डच क्रिकेट असोसिएशन’ यांच्या सहकार्याने विकसित केली जात आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून