Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३० जूनच्या आधी कर्जमाफी मिळणार, कृषीमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई : आगामी खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट असून यंदा राज्यात दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदा १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषित केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ ३० जूनच्या आत राबवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


पुण्यातील शिवाजीनगर भागात नव्याने बांधण्यात आलेल्या ‘सारथी’च्या सभागृहात खरीप हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भरणे बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


यंदा खरिपासाठी २०.१७ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून, २८.०५ लाख क्विंटल साठा उपलब्ध आहे. खतांच्या बाबतीतही राज्य सुरक्षित असून, ४८.८० लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. सद्यस्थितीत २५.१७ लाख मेट्रिक टन खत उपलब्ध असून, टंचाई भासणार नाही याची खबरदारी घेतल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.


दुष्काळाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार


कमी पावसाच्या अंदाजामुळे कृषी विभागाने हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी आणि ‘बीबीएफ’ तंत्रावर भर देण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी ‘महाकृषी’ आणि ‘महाविस्तार’ ॲपसह सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तसेच नुकसानग्रस्त १३६ लाख शेतकऱ्यांसाठी २० हजार १९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अलीकडील अवकाळी पावसाचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण