Plane crash : छत्तीसगडच्या डोंगराळ भागात कोसळले खासगी विमान

जशपूर : छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात आरा पर्वतरांगेत खासगी विमान कोसळले. कोसळलेले चार्टर्ड प्लेन जशपूर जिल्ह्यातील नारायणपूरमधील रतनपहली जंगलात झाडांना धडकले आणि कोसळले. विमान कोसळताच आग लागली. आकाशाच्या दिशेने जात असलेल्या धूर दूरून स्पष्ट दिसू लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले आहे. थोड्याच वेळात मदतकार्य सुरू होईल, असे पोलिसांनी सांगितले. विमानात किती प्रवासी होते ? विमानातल्या प्रवाशांची नावं आदी माहिती अद्याप मिळालेली नाही.


विमान जमिनीपासून ३० फुटांवर उडत असताना अचानक डोंगराळ भागातील जंगलाच्या दिशेने गेले आणि झाडांवर आदळले. डोंगराळ भाग असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत पण परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. एसएसपी लाल उमेद सिंह अपघातस्थळाकडे रवाना झाले आहेत.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि