Borivali : बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नोस्टीक सेंटर खासगी संस्थेकडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला असून त्यातील बोरीवली पश्चिम येथील पंजाबी गल्लीतील महानगरपालिकेच्या मालकीच्या पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक्स सेंटर हे आता खासगी संस्थेला चालवण्यास देण्यात येणार आहे. यासाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड या कंपनीला चालवण्यास देण्यात येणार आहे. खासगी सहभाग तत्त्वावर या संस्थेची निवड महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.


महानगरपालिकेच्या मालकीचे बोरीवली पश्चिम येथे पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक्स सेंटर हे प्लॉट क्र. एफपी नं. ११या ठिकाणी असून तळमजला अधिक दोन मजले अशी एकूण २९८३.१४ चौ. मिटर इतक्या क्षेत्रफळाची जागा बांधून तयार आहे. या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर या जागेवर बाह्य रुग्ण विभाग, विविध तपासण्या व चाचण्यासाठी प्रयोगशाळा, डायलेसिस केंद्र, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन महानगरपालिकेने निश्चित केलेल्या व महानगरपालिकेच्या रुग्णांना सध्या लागू असलेल्या दराने सुरू करण्यात येणार आहे.


क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड संस्थेला, सर्वसामान्य तसेच अत्याधुनिक बाह्य रुग्ण आणि ओटीपीटी विभाग, मूलभूत सोनोग्राफी आणि मेमोग्राफी (पॅथोलॉजी आणि रेडिओलॉजी) निदान सेवा, सी.टी. आणि एम.आर.आय. स्कॅन ह्या सेवा सुविधा सुरू करण्याकरिता नेमणूक करण्यात आली आहे. पुढील ३० वर्षांकरता या संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासाठी सस्थेला देण्यात येणाऱ्या जागेसाठी प्रत्येक वर्षी २ कोटी ०५ लाख रुपये एवढे अधिमुल्य आकारले जाणार आहे.


बोरीवली या क्षेत्रात पूर्व आणि पश्चिम विभाग मिळून जवळपास २० लाख लोकवस्ती असून यासाठी बोरीवली येथे भगवती रुग्णालयात ११० खाटांचे रुग्णालयात सुरू आहेत. या रुग्णालयात बाह्य रुग्णविभाग, विविध तपासण्या व चाचण्यासाठी सर्व सामान्य तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय स्कॅन या विविध सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. नजीकच्या काळात बोरीवली (पश्चिम) येथे ४९० रुग्णशय्या असलेले नव्याने भगवती रुग्णालय सुरू होणार आहे. परंतु तोपर्यन्त स्थानिक लोकांना कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे लागतात. या रुग्णालयात डहाणू, ठाणे, वसई-विरार, मिरा-भायंदर या परिसरातील रुग्ण तसेच गोराई, दहिसर, कांदिवली, बोरीवली येथील स्थानिक रुग्णपण उपचारासाठी दाखल होतात. या सुविधा महानगरपालिकेतर्फे देण्यासाठी आवश्यक ते डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करावी लागते व त्यांच्या आस्थापनेसाठी कायम स्वरूपी खर्च करावा लागतो. वरील उपाय म्हणून सद्यस्थितीत ही या संस्थेची निवड करुन त्यांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने