Mumbai Local Train : समोरासमोर धावणाऱ्या लोकलचा थोडक्यात अपघात टळला; CSMT येथे तांत्रिक बिघाडाने खळबळ

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी दुपारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सव्वातीनच्या सुमारास बदलापूरहून आलेली जलद लोकल तांत्रिक बिघाडामुळे नियोजित फलाटाऐवजी दुसऱ्याच फलाटावर वळवण्यात आली. मात्र त्या फलाटावर आधीच एक लोकल उभी असल्याने दोन्ही गाड्या समोरासमोर येण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली.


परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोटरमनने तत्काळ ब्रेक लावत प्रसंगावधान दाखवले आणि संभाव्य अपघात टळला. या घटनेमुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ते ८ दरम्यानची रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. एकाच ट्रॅकवर आलेल्या लोकलला सुरक्षितपणे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हळूहळू सेवा पूर्ववत करण्यात आली.



वाहतूक कोलमडली, प्रवाशांचे हाल :


ऐन गर्दीच्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आणि CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. अनेकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.


रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सिग्नल यंत्रणेत नेमका कोणता बिघाड झाला याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या बॅकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून, रखडलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.