Marathi Rapper RocKsun : मराठमोळा रॅपर रॉक्सनच्या गाण्यांची हिप-हॉपमध्ये क्रेझ

मुंबई: महाराष्ट्राच्या हिप-हॉप क्षेत्रात उदयास आलेला तरुण आणि दमदार आवाज म्हणजे रॉकसन. आपल्या प्रभावी गीतलेखन आणि वास्तववादी मांडणीमुळे रॉक्सनने अल्पावधीतच संगीतप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. रॉक्सनला ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये नवरदेव बी एस सी ॲग्री या चित्रपटातील “लाल चिखल” या गीतासाठी उत्कृष्ट गीत म्हणून नामांकन मिळालं आहे. त्याने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.


२०१७ पासून संगीत आणि रॅपिंग क्षेत्रात सक्रिय असलेल्या रॉक्सनला २०२१ साली प्रदर्शित झालेल्या “गुलाबाच्या फुला” या गाण्यामुळे मोठी ओळख मिळाली. या गाण्याने त्याला महाराष्ट्रात मराठी रॅपर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. रॉक्सनची दिग्गज, रक्कम, महान, सल्तनत अशी अनेक मराठी रॅप गाणी प्रसिद्ध आहेत.


रॉक्सनच्या संगीताची खासियत म्हणजे सामाजिक विषयांवर आधारित आशयपूर्ण मांडणी. युवकांचे प्रश्न, संघर्ष, आणि वास्तव जीवनातील अनुभव यांना तो आपल्या गाण्यांमधून प्रभावीपणे व्यक्त करतो. पारंपरिक मराठी संस्कृती आणि आधुनिक हिप-हॉप शैली यांचा संगम त्याच्या कामामध्ये स्पष्टपणे दिसून येतो.



रॅपर रॉक्सन त्याच्या रॅपिंग करिअरविषयी सांगतो, “मी २०१७ पासून संगीत आणि रॅपिंग क्षेत्रात सक्रिय आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या “गुलाबाच्या फुला” या गाण्यामुळे मोठी ओळख मिळाली. मला ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये “लाल चिखल” या गीतासाठी उत्कृष्ट गीत म्हणून नामांकन मिळालं आहे. “लाल चिखल” हे केवळ एक गाणं नसून, समाजाची एक काळी बाजू आहे. काही चुकीच्या प्रथा, यंत्रणा, समाज शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करतो हे त्या गाण्यात मांडल आहे. शेतकऱ्यांचं खर आयुष्य मी या गाण्यात दर्शवलं आहे. या गाण्याला नामांकन मिळालं यात मला आनंदच आहे परंतु या समाजाला आणि यंत्रणांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेवून जमेल तशी मदत करावी.”


आजच्या डिजिटल युगात रॉक्सनने विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर आपली उपस्थिती मजबूत केली आहे. त्याच्या गाण्यांना तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, मराठी हिप-हॉपला नवी उंची देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.आगामी काळात रॉक्सनकडून अधिक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी प्रोजेक्ट्सची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठी संगीत क्षेत्रात त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून, तो नव्या पिढीसाठी एक महत्त्वाचा आवाज म्हणून उदयास येत आहे.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी