Mumbai Local Update : दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे विस्कळीत; दिवा स्थानकात प्रचंड गर्दी

ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली रेल्वे स्थानक येथे सोमवारी लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरून झालेल्या अपघाताचा परिणाम दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.


विशेषतः दिवा रेल्वे स्थानक येथे सकाळपासूनच प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर टोकापर्यंत खच्चून भरलेली गर्दी दिसून येत होती. महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय होती. या गर्दीचे छायाचित्रे सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करत आहेत.



दरम्यान, सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खर्डी स्थानकाजवळ रात्री आवश्यक दुरुस्ती कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक पहाटे तीन वाजता संपून सेवा पूर्ववत होणे अपेक्षित होते, मात्र तो सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिल्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक ठप्प झाली.



या सर्व घडामोडींमुळे मंगळवारीही मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून प्रवाशांना उशिरा धावणाऱ्या गाड्यांचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असले तरी सध्या तरी प्रवाशांना गर्दी आणि विलंबाचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने