BJP : भाजपकडून २३ प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई : पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यामध्ये अनुभवी नेत्यांसोबतच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देत पक्षाने २३ प्रवक्त्यांची मोठी फौज मैदानात उतरवली आहे.


प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत विश्वास पाठक, प्रमोद जठार, अजित चव्हाण, अवधूत वाघ, गणेश खणकर, श्वेता शालिनी, शिवराय कुलकर्णी, राम कुलकर्णी, अतुल शाह, विनोद वाघ, गणेश हाके आणि कुणाल टिळक यांचा समावेश आहे. यासोबतच विनायक आंबेकर, राजीव पांडे, पंकज मोदी, आसिफ भामला, जितेन गजारिया, प्रमोद राठोड, प्रीती गांधी, शिवानी दाणी, अजय पाठक, लक्ष्मण सावजी आणि समीर बाकरे अशा अनुभवी नेत्यांकडेही प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


स्थानिक स्तरावरही पक्षाचा प्रचार आणि प्रसिद्धी प्रभावी व्हावी, यासाठी सात विभागांमध्ये 'विभागीय प्रसिद्धी प्रमुख' नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये कोकण विभागाची धुरा सतीश धारप यांच्याकडे, तर ठाणे विभागाची जबाबदारी दीपेश म्हात्रे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पालघरसाठी समीर पाटील, पूर्व विदर्भासाठी कल्पना नालस्कर, पश्चिम विदर्भासाठी अन्नू शर्मा, उत्तर महाराष्ट्रासाठी गोविंद बोरसे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी संजय मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात