केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड प्रस्थापित केला असून या अध्ययन सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, या सर्वांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानोपासना, क्षमताविकास आणि उत्तम सार्वजनिक सेवा देण्याच्या दृष्टीने मिशन कर्मयोगी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचेही आभार मानले आहेत.

महाराष्ट्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘आयगॉट कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर एकूण ४६ लाख ९४ हजार ५९७ अभ्यासक्रम पूर्ण करत ६ लाख ५९ हजार ७५९ एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमता विकासाबाबत राज्याच्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक, असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

देशभरातील सुमारे ३३ लाख ४ हजार शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘साधना सप्ताहा’त सहभाग घेत ‘iGOT कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर सुमारे चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यामध्ये राज्यातील ५ लाखांहून अधिक अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले होते. या उपक्रमात महाराष्ट्राने केलेली कामगिरी ही राज्याच्या प्रशासनिक कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन