Nashik Crime : भोंदू खरातला गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारे डॉक्टर रडारवर; SIT तपासात नवा धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिकसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) रोज नवीन खुलासे होत आहे. भोंदू खरातची विशेष तपास पथकाकडून सध्या (SIT) कसून चौकशी सुरु आहे. खरात सध्या त्याच्या पाचव्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीत आहे. सुरुवातीच्या पाचही गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आणि याच चौकशीत खरातकडून धक्कादायक खुलासे करण्यात SIT ला यश येत आहे. दरम्यान पीडित महिलेच्या गर्भपातप्रकरणी आता SIT च्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका पीडित महिलेच्या गर्भपातप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान काही गंभीर खुलासे झाले आहेत.


महापालिकेत डॉक्टरही खरातवर मेहरबान ?


अशोक खरातला (ashok kharat ) ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत काही डॉक्टर्सनी खरातला मदत केल्याचा संशय चौकशीत बळावला होता. त्यामुळे नाशिकमधील डॉक्टर्स पोलिसांच्या रडारवर होते. नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर्ससह राज्यात इतर आणखी किती आणि कोणते डॉक्टर्स खरातच्या संपर्कात होते याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.

दरम्यान आता तपासात असे उघड झाले आहे की, नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांसह महापालिकेतील एका डॉक्टरनेही अशोक खरात याला मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खरात प्रकरणात याच काही संबंधित डॉक्टरांमार्फत पीडित महिलेस गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्या जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात आता वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली असून वैद्यकीय क्षेत्रातील काही व्यक्तींची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

अशोक खरात (Ashok Kharat Case) याने वैयक्तिक अडचणी सोडवण्याच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. पीडित महिला गरोदर राहिल्यास त्यांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात असल्याची धक्कादायक बाब याप्रकरणात उघड झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात संबंधित डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी पाचारण करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, काही सोनोग्राफी केंद्रांच्या भूमिकेचाही तपास सुरू असून गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, याचाही शोध घेतला जात आहे.

भोंदू खरातची आज होणार पाचव्या गुन्ह्यात सुनावणी


भोंदू खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. खरातची पाचव्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीची मुदत आज गुरुवारी (ता. २३) संपत आहे. त्यामुळे त्यास पुन्हा सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसीद्वारे न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. एसआयटीकडे खरातविरोधातील नऊ गुन्हे तपासकामी आहेत. यात आठ गुन्हे महिला अत्याचाराचे, तर एक फसवणुकीचा आहे. यात खरात सध्या पाचव्या गुन्ह्यात एसआयटीच्या ताब्यात असून, कसून चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

School Bus Fire : उन्नावमध्ये शालेय बसला भीषण आग! 60 विद्यार्थी थोडक्यात बचावले; महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे लखनौ-कानपूर महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन

Tesla Roadster : हवेत उडणारी कार खरंच बाजारात येणार ? टेस्लाची नवी Roadster चर्चेत, पण...

Tesla Roadster : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाची (Tesla) नवी रोडस्टर कार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या

संपत्तीच्या वादात माणुसकी हरवली ! 3 दिवस घरातच पडून राहिला वृद्धाचा मृतदेह, अखेर...

पैसा, संपत्ती आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी माणुसकी हरवत चालल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. तेलंगणातील एका

Andhra Pradesh Temple : नवरात्रीत देवीची अनोखी सजावट! तब्बल 4.42 कोटींच्या नोटांनी मंदिर सजवलं; पाहून व्हाल थक्क!

आंध्र प्रदेशातील अमलापूरम येथील श्री वासवी कन्यका परमेश्वरी अम्मावरू मंदिर सध्या आपल्या अनोख्या सजावटीमुळे

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक