Navi Mumbai : शर्तभंग झालेल्या सिडको, नैनाकडील जागा सरकारजमा करा!

मुंबई : महसूल विभागाकडील जागा सिडको, नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र) अशा स्थानिक प्राधिकरणांना देण्यात आल्या असून, त्यांनी त्या अनेक वर्षे विकसित करण्यात केलेल्या नाहीत तसेच ज्याठिकाणी शर्तभंग झालेला आहे, त्या जागा पुन्हा सरकारच्या ताब्यात घेण्यात याव्यात असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले.


महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील बैठकीत हे आदेश दिले गेले. बैठकीला कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकण विभागीय आयुक्तांना या प्रकरणाची सखोल माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित जागा किती आणि कोणाकोणाला देण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये कायदेशीर अटींचा (शर्तभंग) भंग झाला आहे का, याची तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्त एक विशेष समिती गठीत करणार आहेत. ही समिती संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन, सिडको आणि नैना कडील जागा परत घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करेल. या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.


या बैठकीत केवळ सिडको-नैना जमिनींचा ताबा घेण्यासोबतच इतरही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध संस्थांना जागांचे वाटप करणे, इतर संस्थांकडे असलेल्या वापर नसलेल्या शासकीय जागा ताब्यात घेणे या विषयांचाही समावेश आहे. या निर्देशांमुळे बेकायदेशीररीत्या बळकावलेल्या किंवा शर्तभंग झालेल्या जागा पुन्हा सरकारच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने