मनुष्य जन्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


आपण सध्या प्रबोधनासाठी घेतलेला विषय म्हटला तर अत्यंत कठीण आहे. म्हटले तर खूप सोप्पा आहे. तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजेच अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचे आहे. म्हणूनच हा विषय आपण निराळ्या प्रकारे वेगवेगळ्या अंगाने पाहत आहोत. म्हणजेच संचित, प्रारब्ध, क्रियमाण या संकल्पनांतून. ह्या शब्दांचे नेमके अपेक्षित अर्थ आपल्याला समजत नाहीत, म्हणून आपल्याला जीवन सुखावह करता येत नाही, समृद्ध करता येत नाही, यशस्वी करता येत नाही. मी मागल्या खेपेस सांगितले, इथे कुठेही अंधश्रद्धा नाही. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. तुम्हाला भूक लागली तर ती प्रयोगशाळेत सिद्ध करता येते का? पोटात कळा येऊ लागल्या तर त्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. सर्वच गोष्टी प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. संचित घेऊन माणूस जन्माला येतो हे प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नसले तरी त्याला अनुमान प्रमाण आहे. अनुभव प्रमाण आहे.


ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की , "मनुष्य जाणिजे बोले, वृक्ष जाणिजे फळे; भोग जाणिजे केले, पूर्वजन्माचे". ही गोष्ट ध्यानात घेतली तर माणसाचे संचित म्हणजे गोदाम आहे. ह्या गोदामामध्ये आधीचे साठलेले पापपुण्य हा माल येऊन पडतो आणि तोच पापपुण्याचा भाग त्याच्या वाट्याला येतो. अगदी सुरुवातीला तो नैसर्गिक पद्धतीने येतो. हे जन्माला आल्यापासून ते समजायला लागेपर्यंत नैसर्गिक पद्धतीने येतो. हा संचितातील पापपुण्याचा भाग जो वाट्याला येतो त्याला प्रारब्ध म्हणतात. हे प्रारब्ध प्राथमिक अवस्थेत निसर्गाच्या नियमाप्रमाणे येते. पुढे काय होते? आपण जसेजसे मोठे होतो तसे आपल्याला संस्कार मिळतात, शिक्षण मिळते, शिकवण मिळते. ह्या संस्कार, शिकवण, शिक्षण ह्याप्रमाणे आपण विचार करतो, उच्चार करतो, आचार करतो, कृती करतो. हे संस्कार घरातून मिळतात, शाळा, कॉलेजात मिळतात, धर्मसंस्थेतून मिळतात. समाजातून मिळतात. हे जे संस्कार होतात त्या संस्काराप्रमाणे आपले विचार, उच्चार, आचार निर्माण होतात व त्याप्रमाणे माणसाच्या बुद्धीची जडणघडण करण्याचे काम हे संस्कार करतात. म्हणून हिंदू संस्कृतीत मूल जन्माला आले की त्याच्यावर त्याप्रमाणे संस्कार होतात. मुस्लीम संस्कृतीत मूल जन्माला आले की त्याच्यावर त्याप्रमाणे संस्कार होतात. अशा तऱ्हेने निरनिराळ्या संस्कृतीत मूल जन्माला येते तेव्हा त्यातून संस्कार, शिक्षण व शिकवण मिळते. प्रत्यक्षात मूल जन्माला येते तेव्हा त्याला निवड किंवा पसंतीचा अधिकार नसतो. हिंदू धर्म की मुस्लीम धर्म असा पर्याय नसतो. संस्काराचे महत्त्व अधोरेखित करताना एका श्लोकात असे म्हटले आहे की "जन्मना जायते शूद्र:, संस्काराद द्विज उच्यते।|" याचा अर्थ असा की कोणतेही मूल जन्माला येते तेव्हा ते कोरे असते, अज्ञानी असते. ते ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आले तरी किंवा वैश्याच्या पोटी जन्माला आले तरी. कोणाच्याही पोटी कोणत्याही धर्मात जन्माला आले तरी ते सारखेच. मग त्यावर जे संस्कार होतात व त्यातून त्याला जे ज्ञान मिळते त्यातच त्याचा दुसरा जन्म होतो. म्हणजेच पहिला जन्म आईच्या पोटातून होतो व दुसरा जन्म संस्कारातून होतो.

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये