Mumbai Clean League : स्वच्छतेच्या निकषांवर आता सर्व सहायक आयुक्तांच्या कामांचे मूल्यमापन

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे निर्देश


मुंबई : मुंबई क्लीन लीगमध्ये रहिवासी संकूल, वाणिज्य संकुलांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा. मुंबई क्लीन लीगमध्ये स्वच्छतेच्या निकषांवर सर्व सहायक आयुक्तांचे मूल्यमापन करण्याचे निर्देश आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून सर्व सहायक आयुक्तांनी महानगरपालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व अतिरिक्त आयुक्तांनी आपापल्या विभागातील (शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे) सहायक आयुक्त, अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासह वेळोवेळी त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करावे, असे निर्देशही आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.



मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, के दक्षिण या प्रशासकीय विभाग अंतर्गत धर्मशाळा चौकी, शासकीय तंत्रनिकेतन (खेरवाडी, वांद्रे पश्चिम) समोर सुरू असलेली रस्त्यांची स्वच्छता, पश्चिम द्रुतगती महामार्ग, चर्चरोड मरोळ सेक्शन रस्ता चौकी, अंधेरी पूर्व येथील गुरू गोविंदसिंगजी मार्गावरील वाहनतळ, जे. बी. रोड मेट्रो स्टेशन चौकी, चर्चरोड मरोळ अंधेरी पूर्व येथील सावित्रीबाई फुले उद्यान येथे बुधवारी २२ एप्रिल २०२६ पहाटे आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.


वांद्रे (पश्चिम) येथील धर्मशाळा चौकी येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरीपट तपासले. स्वच्छतेसाठी आधुनिक वाहने किती आहेत, स्वच्छतेचे दैनंदिन कामकाज कसे चालते, यासाठी दररोज किती कामगार हजर असतात, याची सखोल चौकशी केली. महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात सकाळच्या स्वच्छतेवर अधिक भर देणे गरजेचे आहे. यासोबतच रस्ते दुभाजक, चौक तसेच रस्त्यांच्या कडेला व मोकळ्या जागांमधील राडारोडा उचलून कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावण्यात यावी. मुंबईतील रस्त्यांवर उघडपणे दिसणारा कचरा उचलण्यासाठी परिमंडळांतील उप आयुक्त, प्रशासकीय विभागांतील सहायक आयुक्त यांनी दररोज पहाटे घनकचरा व्यवस्थापन चौक्यांना प्रत्यक्ष भेट देवून स्वच्छतेच्या कामांची खातरजमा करावी, असे निर्देश आयुक्त भिडे यांनी दिले.



अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरा


‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडे कुशल मनुष्यबळ आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. त्याचा सुयोग्य वापर करून मुंबई अधिक स्वच्छ ठेवण्यावर भर देणे गरजेचे आहे. एखाद्या ठिकाणचा कचरा उचलल्यानंतर ती जागा लगेच स्वच्छ करा. यासाठी प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करायला हवेत. तसेच नागरिकांमध्येही स्वच्छतेविषयी जनजागृती करा. यासाठी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा, असेही त्यांनी सांगितले.


‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्वच्छतेची दृश्यमानता वाढविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागाने आपापसातील तसेच इतर प्राधिकरणांशी परस्पर समन्वय वाढवावा. यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री आणि कुशल मनुष्यबळाचा योग्य वापर करून मुंबईतील प्रमुख रस्ते-महामार्ग, त्याभोवतीचा परिसर, दुभाजक स्वच्छ ठेवावेत. मोकळ्या जागांवरील बांधकाम राडारोडा तात्काळ हटवून मुंबईचे सौंदर्य वाढविण्यास प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने