Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग ॲक्ट २०२५’ हा नवीन कायदा आगामी १ मे पासून संपूर्ण देशभर लागू होणार आहे.


या कायद्याचा उद्देश ऑनलाइन गेमिंग उद्योगाला ठोस चौकटीत आणणे आणि त्याचे संचालन अधिक पारदर्शक व सुरक्षित करणे हा आहे. यासाठी केंद्र सरकारने ‘ऑनलाइन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया’ (ओजीएआय) नावाची नवी नियामक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेचे नेतृत्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अपर सचिवांकडे सोपविण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था देशातील गेमिंग कंपन्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणार असून नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणार आहे.



नवीन कायद्यानुसार, पैशांशी संबंधित आणि जोखमीच्या गेम्सवर (मनी/रिस्क गेम्स) विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. सर्व गेमिंग कंपन्यांना त्यांच्या गेम्सची नोंदणी ओजीएआयकडे करणे अनिवार्य असेल.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ३ वर्षांपर्यंत कारावास आणि १ कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, परदेशातून चालवल्या जाणाऱ्या गेमिंग प्लॅटफॉर्मनाही या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.



सरकारच्या या निर्णयामुळे ऑनलाइन गेमिंग क्षेत्र अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि जबाबदार बनण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः सट्टेबाजीसारख्या जोखमीच्या गेम्सवर नियंत्रण आणण्यावर भर दिला जाणार आहे, तर कौशल्याधारित गेम्ससाठी काही प्रमाणात सवलती राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि