West Bengal - Tamil Nadu Election 2026 : पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद

आज म्हणजेच २३ एप्रिल, गुरुवारी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. बंगालमध्ये २९४ पैकी १५२ जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदानात ९१.३५% मतदानाची नोंद झाली. तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर विक्रमी ८४.२९% मतदान झाले.


दोन्ही राज्यांच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले. निवडणूक आयोगाची आकडेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची असून, त्यात बदल होण्याची शक्यता आहे.


यापूर्वी, ९ एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्येही विक्रमी मतदान झाले. आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक ८५.९१% मतदानाची नोंद झाली, पुदुचेरीमध्ये ९०% आणि केरळमध्ये १९८७ नंतरचे सर्वाधिक ७८.२७% मतदान झाले. या पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी एकाच वेळी जाहीर केले जातील.


पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी १४७८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होत आहे. राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे. निवडणूक काळात झालेल्या जाळपोळ, तोडफोड आणि मारहाणीच्या घटनांनी परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. मुर्शिदाबादमध्ये एजेयूपी प्रमुख आणि रेजीनगरचे उमेदवार हुमायून कबीर यांच्या ताफ्यावर दंगलखोरांनी काठ्या आणि विटांनी हल्ला केला. या घटनेनंतर टीएमसी आणि एजेयूपी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संघर्ष झाला. कबीर यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून पोलिसांशीही त्यांचा वाद झाला. दक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंजमध्ये भाजप उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावरही हल्ला झाल्याचा आरोप आहे. बूथ जॅमिंगची तक्रार मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सरकार यांना काही जणांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले.



कूचबिहारच्या तुफानगंज परिसरात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय सुरक्षा दलांनी लाठीमार करत जमाव पांगवला. मालदामध्ये ईव्हीएम बिघाडामुळे संतप्त मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याला घेराव घालून ओलीस धरले. तसेच हरिश्चंद्रपूरमध्ये टीएमसीच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात पक्षाच्या कॅम्प ऑफिसची तोडफोड करण्यात आली. सिलिगुरीमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाली. केंद्रीय दलांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.



तृणमलू काँग्रेस अर्थात टीएमसीने बाहेरून गुंड आणल्याचा आरोप होत आहे. आसनसोल उत्तरचे उमेदवार मलय घटक यांनी पाच विशेष ट्रेनमधून बाहेरील लोकांना आणल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.


Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी