BMC News : महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्यावरून भाजपा नगरसेविकेने घेतला विरोधकांचा समाचार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्यावरून भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मागील वेळेवर सत्तेवर असलेल्या पक्षाने कोणतीही विकास कामे केलेली नाहीत. त्यामुळे विकासकामेच केली नाही तर पैसे खर्च होतच नाही. त्यामुळे मुदत ठेवींच्या रकमा वाढल्या असे सांगत सातम यांनी प्रशासक काळामध्ये दीड लाख कोटींची कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे निश्चितच त्यासाठी ठेवलेला पैसा खर्च झाला. त्यामुळे विरोधी पक्षाने मुदत ठेवींवर न बोललेच बरे अशा शब्दांत टिका केली.तसेच आदीवासी पाड्यांमधील विकास कामांसाठी केवळ पाच कोटी रुपयांचा निधी कमी असून तो वाढवण्यात यावा आणि यासाठीच्या सर्व परवानगी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून महापालिकेने समन्वय राखून द्यावा. म्हणजे आदीवासी जनतेला सेवा सुविधा आपण देवू शकतो अशी सूचनाही महापौरांना केली.


मुंबई महापालिकेच्या सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर महापालिकस सभागृहात बोलतांना भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी महापौरांचा पायगुण चांगला आहे, म्हणून महापालिका प्रथम महिला आयुक्त लाभल्या असे सांगत महापौर आणि आयुक्तांचे अभिनंदन केले. त्यानंतर मुदत ठेवीच्या मुद्दयाचा समाचार घेतला. मुदत ठेवीतील रक्कम ही पायाभूत विकासकामांसाठी बँकेत ठेवली होती आणि त्याच कामांसाठी खर्च करावी लागली. हे सांगताना सन २०१७-१८ ते सन २०२१-२२ या सत्ता काळात केवळ २९ हजार कोटींची प्रकल्प कामे हाती घेण्यात आली होती, तर प्रशासकांच्या पावणे चार वर्षांच्या काळात १ लाख ५७ हजार कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती,अशी आकडेवारी सांगत त्याचसाठी मुदतठेवींमधील पैसा जर खर्च झाला तर त्याला मुदत ठेवी मोडल्या असा कांगावा का करता असा सवाल विरोधी पक्षाला केला. याशिवाय जर जकात कर आज सुरु असता तर सध्या जीएसटीच्या माध्यमातून जे सुमारे १५ हजार कोटींचा महसूल प्राप्त झाला नसता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा धाडसी निर्णय घेत महापालिकेचा महसूल वाढवताना महापालिकेतील अधिकाऱ्यांचे कट कमिशन बंद करून टाकले अशीही टिका केली.



यावेळी विशेष मुलांच्या मुद्दयावर भावनिक होत त्यांनी स्पेशल चाईल्डच्या पालकांची व्यथा मांडली. त्यामुळे अशा मुलांना उपचार घेण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागांमध्ये विशेष मुलांसाठी शाळा सुरु करण्यात याव्यात अशी सूचना केली. तसेच महापालिकेच्यावतीने आरोग्य व्यवस्थापन प्रणाली अर्थात एचएमआयएस राबवली जात असली तरी सिंगापूरच्या धर्तीवर हेल्थ हब तयार करण्याचीही सूचना केली. तसेच आरे कॉलनीतील आदीवासी समाजाला सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक निधी देण्यात यावा आणि त्यांच्या आरोग्यासाठी दवाखाने, रुग्णवाहिका सेवाही उपलब्ध करून देण्यात यावी.


फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात प्रशासन चालढकल करत असून त्यांना पुरेसे मनुष्यबळ आणि वाहने उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून त्यामाध्यमातून फेरीवाल्यांना कारवाई करून रस्ते व पदपथ फेरीवाला मुक्त करता येतील. याशिवाय पदपथांवर पेव्हर ब्लॉक लावताना ते सच्छिद्र असले पाहिजे, जेणेकरून त्यातून पावसाचे पाणी जमिनीत मुरेल आणि पादचाऱ्यांनाही योग्यप्रकारे चालता येईल. याशिवाय पाणी चोरी आणि गळती प्रकरणाची तसेच टँकर माफियांची एसआयटी मार्फत चौकशी केली जावी अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.



महापालिकेचा हा अर्थसंकल्प म्हणजे मुंबईच्या सर्वांगीण विकासाची मजबूत पायाभरणी करणारा असा आहे असे वर्णन करत सातम यांनी हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांची बेरीज नाही तर तो प्रगत मुंबईचा अॅक्शन प्लान आहे.आम्ही अडथळ्यावर मात करून पुढे जाणारे लोक आहोत. आगामी पाच वर्षात हा ऍक्शन टेकन रिपोर्ट जेव्हा आमचा पक्ष जनतेसमोर येईल तेव्हा मुंबई खऱ्या अर्थान एक जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि प्रदुषणमुुक्त शहर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कित्येक वर्षे खुर्ची उबवली, पण मुंबईला खड्डे आणि पावसाळ्यात तुंबलेले रस्तेच दिले. स्वार्थाच्या राजकारणात त्यांनी सामान्यांचे जगणेच कठिण केले होते. पण आम्ही हिशोब देवू प्रत्येक पैशांचा, आणि अन प्रत्येक घामाच्या थेंबांचा. हा अर्थसंकल्प म्हणजे पाया आहे, पारदर्शक आण्याि भ्रष्टाचारमुक्त युगाचा अशा शेलक्या भाषेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतल.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने