Mega block : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवार २६ एप्रिल २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी, देखभाल कामांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी / वांद्रे विभागांदरम्यानच्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गांवर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गांवर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या तसेच वाशी / बेलापूर / पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत सुटणाऱ्या व वांद्रे / गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्ग सेवा रद्द राहतील.


मेगाब्लॉक असल्यामुळे पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची अप हार्बर मार्गांवरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची अप हार्बर मार्गांवरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष सेवा चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गाच्या प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण सेक्शनवर रविवार २६ एप्रिल २०२६ रोजी मेगाब्लॉक नाही.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने