संतापजनक ! ९ तासांत २ बलात्कार, आधी मित्राची बायको तर नंतर IRS अधिकाऱ्याची मुलगी...; 'त्या' घटनेने सर्वच हादरले

दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi) उच्चभ्रू परिसर असलेल्या अमर कॉलनीत एका आयआरएस अधिकाऱ्याचे घर आहे. एवढ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या घरी घडलेली घटना सर्वांना हादरवून सोडणारी आहे. बुधवारी (22 एप्रिल) सकाळी, एका आयआरएस अधिकाऱ्याच्या (IRS) 22 वर्षीय मुलीची तिच्याच घरात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तिच्यावर आधी लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि नंतर मोबाईल चार्जरच्या वायरने गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. घटनेवेळी, 1997 च्या बॅचचे अधिकारी (IRS) दिनेश गुप्ता आणि त्यांची पत्नी जिममध्ये होते. या हत्येतील १९ वर्षीय आरोपी राहुल मीना हा घरातील माजी नोकर असून, त्याला महिनाभरापूर्वीच कामावरून काढून टाकण्यात आले होते. अशी माहिती समोर आली आहे.


आधी मित्राच्या बायकोवर अत्याचार नंतर...


राजस्थानच्या अलवर येथील १९ वर्षीय आरोपी राहुल मीना आधी मित्राच्या बायकोवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिथून फरार होऊन तो २२ एप्रिलला सकाळी दिल्लीत आला. दिल्लीत तो एका IRS अधिकाऱ्याच्या घरात घुसला आणि तिथे IRS अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिची हत्या केली. अवघ्या ९ तासांत आरोपी युवकाने ही कृत्य केलीत. हत्येच्या आदल्या दिवशी अन् हत्येनंतर आरोपी राहुलला पोलिसांना कसं पकडलं याचा खुलासा झाला आहे.


अलवरहून दिल्लीपर्यंतची या निर्दयी आरोपीची कहाणी ऐकून कुणाचाही थरकाप उडेल. दिल्लीच्या उच्चभ्रू वस्तीतील अमर कॉलनी, जिथे आयआरएस अधिकारी दिनेश गुप्ता यांचे घर होते. या घरात सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी आरोपी शिरला. पिवळा शर्ट, काळी पँट आणि बूट घातलेले. आरोपी सातत्याने कुणाशी तरी फोनवर बोलत होता. हा आरोपी होता राहुल मीणा, ज्याचे वय केवळ १९ वर्ष. या आरोपीने अधिकाऱ्याच्या मुलीसोबत बळजबरी केली आणि फोन चार्जरच्या वायरने तिचा गळा दाबला. तिच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण केली. त्यानंतर घरातून अडीच लाख घेऊन पसार झाला.


राहुल मीनाची पार्श्वभूमी


 १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेला राहुल अभ्यासात हुशार होता. दहावीत त्याला चांगले मार्क्स मिळाले होते. बारावीत त्याला ९० टक्के मार्क्स मिळाले होते. मात्र त्यानंतर राहुलला ऑनलाइन गेमिंगचा छंद लागला. तो ऑनलाइन लुडो खेळायचा. याच लुडोसाठी त्याने घरातील सामान, १० वी, १२ वीची मार्कशीट आणि त्याचा मोबाइलही गहाण ठेवला होता. अलीकडेच त्याने ऑनलाइन गेमिंगमधून ५ लाख जिंकले होते.


२० एप्रिलला राहुल गावातील कुणाच्या तरी लग्नात गेला होता. राहुल आणि त्याचा मित्र विष्णू दोघे एकत्र लग्नाला जात होते. विष्णूने राहुलला त्याची बाईक दिली आणि चावी पत्नीला दे असं सांगितले. चावी देण्याच्या बहाण्याने राहुल मित्राच्या घरी गेला. तेव्हा मित्राची पत्नी एकटीच होती. त्यावेळी राहुलने तिच्यासोबत जबरदस्ती केली. मात्र लुडोमध्ये हरलेल्या पैशांमुळे विष्णूने हा खोटा आरोप लावल्याचा दावा राहुलने केला. विष्णूने राहुलला ९० हजार लुडो खेळायला दिले होते, परंतु ते पैसे परत देत नसल्याने विष्णूने हा आरोप केल्याचे आरोपी राहुलच्या बहिणीनेही म्हटलं.


राहुलने विष्णूच्या पत्नीवर बलात्कार करून तिचा मोबाइलही सोबत घेऊन गेला होता. दिल्ली पोलिसांनी हाच मोबाईल नंबर ट्रॅक केला. राहुल नॉर्मल कॉलऐवजी इंटरनेट कॉलिंगचा वापर करत होता. मात्र त्यासाठी त्याला वाय फान कनेक्शन आवश्यक होते. या फोनचे लोकेशन जेव्हा तो एखाद्या कॉलवर बोलत असेल तेव्हाच मिळू शकत होते. २२ एप्रिलला दुपारी राहुलच्या भावाच्या मोबाईलवर वारंवार एक इंटरनेट कॉल येत होता. पोलिसांनी राहुलच्या भावाची चौकशी केली तेव्हा राहुल त्याला कॉल करत असल्याचं समोर आले. या कॉलच्या माध्यमातून पोलिसांनी राहुल कुठे आहे याचा शोध घेतला. त्यानंतर पोलीस पथकाने एका हॉटेलच्या खोलीतून राहुलला अटक केली.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर