IRCTC ची पुरी – कामाख्या – बैद्यनाथ धाम यात्रा

मुंबई : IRCTC तर्फे भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे आयोजित पुरी – कामाख्या – बैद्यनाथ धाम यात्रा ही भाविकांसाठी एक पवित्र आणि अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव देणारी यात्रा आहे. ही ११ रात्री / १२ दिवसांची यात्रा २५ जून २०२६ रोजी पुणे येथून सुरू होणार आहे. या यात्रेत प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्यात येईल. जगन्नाथ मंदिर (पुरी), कामाख्या मंदिर (गुवाहाटी), बैद्यनाथ धाम (जसीडीह), काशी विश्वनाथ मंदिर (वाराणसी) आणि राम जन्मभूमी मंदिर (अयोध्या). या सर्व सुविधा असलेल्या पॅकेजची सुरुवात फक्त ₹२२,७७०/- प्रति व्यक्ती* पासून आहे. यात्रेसाठीची विशेष एसी/नॉन-एसी पर्यटक ट्रेन प्रवाशांना संपूर्ण भारतभर आरामदायी प्रवास घडवून आणेल तसेच त्यांना आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाचा अनुभव देईल, असे गौरव झा, ग्रुप जनरल मॅनेजर, IRCTC पश्चिम विभाग, यांनी सांगितले. प्रवासी आपल्या सोयीप्रमाणे इकोनॉमी, स्लीपर (SL), स्टँडर्ड 3AC आणि कम्फर्ट 2AC श्रेणींमधून निवड करू शकतात. सुमारे ७५० प्रवाशांची क्षमता असलेली ही ट्रेन पुणे ते नागपूर दरम्यान विविध स्थानकांवर चढणे व उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देईल. यात्रेत प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असून त्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत, असे डॉ. ए.के. सिंह, प्रवक्ते, IRCTC पश्चिम विभाग, यांनी सांगितले. बुकिंग IRCTC Tourism Portal वर सुरू आहे.


पॅकेजची प्रमुख वैशिष्ट्ये:


2AC, 3AC आणि नॉन-एसी स्लीपरमध्ये आरामदायी रेल्वे प्रवास,
बजेट हॉटेलमध्ये निवास व्यवस्था (डबल/ट्रिपल/क्वाड शेअरिंग),
प्रवासादरम्यान शुद्ध शाकाहारी भोजन
एसी/नॉन-एसी ट्रान्सफर आणि पर्यटन स्थळांचे दर्शन,
संपूर्ण प्रवासासाठी विमा संरक्षण
IRCTC चे अनुभवी टूर मॅनेजर


पॅकेज शुल्क:


इकोनॉमी क्लास (स्लीपर): ₹२२,७७०/-
स्टँडर्ड क्लास (3AC): ₹३९,६२०/-
कम्फर्ट क्लास (2AC): ₹५२,८६०/-

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.