Ashok Kharat : खरातने जवळच्या मित्राला देखील सोडले नाही; घातला कोटींचा गंडा

नाशिक : अशोक खरातचे प्रकरण हे अधिक गुंतागुंतीचे होत चालले असून खरातच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आतापर्यंत त्याच्यावर तब्बल १९ गुन्हे दाखल झाले असून शेवटचा गुन्हा खरातच्या जवळच्या मित्रानेच केला आहे अशी माहिती आता समोर आली आहे.




जवळच्या मित्रानेच नोंदवली तक्रार


अशोक खरात प्रकरण मार्च महिन्यात बाहेर आले त्याच्यापाठोपाठ गुन्ह्यांची यादीच निघाली. खरातने अनेकांना मृत्यूची भीती दाखवून, कुटुंब उध्वस्थ करण्याची धमकी देऊन किंवा पैशाच- भरभराटीच आमिष दाखवून महत्वाचा मुद्दा म्हणजे महिलांचे लैंगिक शोषण यामुळे त्याने अनेकांना लाखोंचं गंडा घातला. या सगळ्यात आपल्या मित्राला देखील त्याने सोडले नाही.



मित्राला लाखोंचा गंडा


अशोक खरातने आपला सहकारी सीए ललित पोफळेला तब्बल ८ कोटी ७६ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. मित्राच्या आईबाबांच्या नशिबात मृत्यूचा योग्य आहे तो टाळण्यासाठी अवतार पूजा विधी करायला हव्यात त्यासाठी भरपूर खर्च येईल असे सांगून त्याने मित्राकडून तब्बल ८ कोटी उकळले.



खरातच्या इतर सर्व व्यवहारांमध्ये पोफळे आणि अशोक खरात भागीदार होते. पैसे उकलण्याच्या नादात त्याने स्वतःच्या भागीदारालाही सोडले नाही, अशी अनेक प्रकरण हळू हळू बाहेर येत असल्याने खरात प्रकरण अधिकच वाढत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण