Blast : अखिलेश यादव, राहुल गांधींचा पुतळा जाळताना स्फोट, भाजप महिला आमदार जखमी

बहराइच : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. विरोधकांचा निषेध करत असलेल्या नगरच्या आमदार आणि माजी मंत्री अनुपमा जयस्वाल या सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुतळा जाळत असताना झालेल्या स्फोटात भाजल्या आहेत.

शनिवारी दुपारी सुमारे २:२० वाजता जिल्हाधिकारी (डीएम) चौकात भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. आमदार अनुपमा जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या पुतळ्याचं दहन केले जात होते. आमदारांनी पुतळ्याला आग लावण्यासाठी जशी माचिस पेटवली, तसा पुतळ्याच्या आत अचानक जोरदार स्फोट झाला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल राय यांनी सांगितलं की, पुतळ्यामध्ये कदाचित पेट्रोलचे प्रमाण जास्त होते, ज्यामुळे आगीचा गोळा थेट आमदारांच्या चेहऱ्यावर आला. आमदारांचे कपाळ आणि केसाला आग लागली होती, जी कार्यकर्त्यांनी लगेचच विझवली आणि त्यांना पोलिसांच्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

महाराजा सुहेलदेव मेडिकल कॉलेजचे सीएमएस मदन मोहन मणी त्रिपाठी यांनी सांगितलं की, आमदारांना इमर्जन्सी विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या कपाळावर ४.५ टक्के 'सुपरफिशियल बर्न इन्जरी' झाली आहे. त्यांच्या डोक्यावरचे काही केसही जळाले आहेत, मात्र दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या डोळ्यांना कोणतीही इजा झालेली नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अक्षय त्रिपाठी आणि एसपी विश्वजीत श्रीवास्तव यांनी मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन आमदारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुतळ्यामध्ये नेमका कोणता पदार्थ होता. ज्यामुळे अचानक स्फोट झाला, याचा तपास आता प्रशासन करत आहे.
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा