KEM Hospital : केईएम रुग्णालयात रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न... सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांनी घटनास्थळी केली पाहणी

मुंबई : महानगरपालिकेच्या के.ई.एम. हॉस्पिटल येथे शुक्रवारी सकाळी घटनेत घटनेत 27 वर्षीय एका रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य समिति अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट देऊन सविस्तर पाहणी केली.सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तात्काळ काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील किंवा ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली असेल, त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.



सार्वजनिक आरोग्य समिति अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केईएम रुग्णालयात भेट देऊन त्या दुर्घटना स्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनास कठोर शब्दांत जाब विचारला. रुग्ण आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत कसा गेला?सुरक्षा व्यवस्थेत कुठे त्रुटी राहिल्या?, तसेच रुग्णाच्या कुटुंबीयांवर याचा काय परिणाम झाला अशी प्रश्नांची सरबती करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.


या पाहणीवेळी संबंधित रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत , डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. सर्व संबंधितांसोबत सविस्तर चर्चा करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत निर्देश देण्यात आले.




तसेच, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांना निष्पक्ष तपास करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजही तात्काळ मागवण्यात आले असून त्याचा तपासात उपयोग केला जाणार आहे.


मुंबई महानगरपालिका प्रशासन रुग्णांच्या सुरक्षेबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबवण्यात येतील, असे सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी स्पष्ट केले

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म