Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आधी ऑफिसबॉयने उघड केलेल्या धक्कादायक माहितीच्या पार्श्वभूमीवर आता त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकनेही खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एका चार्टर्ड अकाउंटंटने (CA) या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते. यामुळे फार्महाऊसवर घडणाऱ्या संशयास्पद घटनांची माहिती बाहेर आली. विशेष म्हणजे, या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज विशेष तपास पथकाच्या (Special Investigation Team) हाती लागले असून, त्यातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.



या व्हिडिओमध्ये अशोक खरात महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्याविरोधातील लैंगिक शोषणाचे आरोप अधिक बळकट झाले आहेत. तपास अधिक खोलात जात असून, या व्हिडिओमधून आणखी गंभीर पुरावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात अटक झालेल्या खरात याची तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान रोज नवे खुलासे होत असल्याने आणि पुराव्यांची साखळी वाढत असल्याने, एसआयटीकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता आहे.



तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान अशोक खरात सहकार्य करत नसल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला प्रश्न टाळणारा खरात आता “मला काही आठवत नाही” असे सांगत असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे. यापूर्वीही डोकेदुखी आणि प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.


या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होणार आणि न्यायालय आज काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील