Eknath Shinde : पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचे आडाखे बांधून काँग्रेसची देशद्रोही मानसिकता उघडी पडली!

देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी


काँग्रेसवर शिंदेंची सडकून टीका


ठाणे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असे वक्तव्य करून काँग्रेसने भीतीचे राजकारण सुरू केले आहे, असा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला.


सोमवारी ठाणे येथे खरीप हंगाम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार करत म्हटले की, अशा प्रकारची भाषा ही केवळ निंदनीय नाही, तर देशाच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. ट्रम्प आणि अमेरिकेची तुलना भारताशी किंवा मोदींसारख्या जागतिक नेत्याशी करणे म्हणजे काँग्रेसच्या विचारांची दिवाळखोरी असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.


https://prahaar.in/2026/04/27/agriculture-minister-dattatray-bharne-dna-fingerprint-testing-of-seeds-will-be-conducted-to-identify-bogus-seeds/


शिंदे पुढे म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली देश वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे, शेतकरी सशक्त होत आहेत आणि महिलांना आत्मनिर्भरतेसह सन्मानाचे जीवन मिळत आहे. महिला आरक्षण विधेयकासारखे ऐतिहासिक निर्णय घेण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवली, तर ते विधेयक इंडि आघाडीने पाडले. भीती पसरवून राजकारण करणे ही काँग्रेसची जुनी सवय असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, १४० कोटी भारतीय जनता मोदींसोबत ठामपणे उभी आहे आणि योग्य वेळी काँग्रेसला धडा शिकवेल.



Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर