गॅस सिलेंडर जास्त दिवस टिकवायचा आहे , मग ‘या’ सोप्या टिप्स फॉलो कराच

Fast Essential Hacks for Every Household to Save Fuel : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. कुठे खर्च आणि बचत कशी करावी याचा नुसताच गोंधळ. त्यात गॅस सिलेंडरचे दर म्हणजे , बाप रे ! पण तुम्हांलाही जर हा गॅस सिलेंडर महागाईच्या दिवसात जास्त दिवस टिकवायचा असेल तर तुम्हांलाही काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स फॉलो करायच्या आहे. कारण स्वयंपाकाची तयारी करण्यापासून ते भांड्यांच्या निवडीपर्यंत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा थेट परिणाम गॅसच्या वापरावर होतो. तर काय आहेत या सोप्या टिप्स जाणून घेऊयात.


वाढत्या महागाईच्या काळात घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक झाले आहे. स्वयंपाकाचा गॅस हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग आहे. अनेकदा स्वयंपाक करताना काही छोट्या चुका करतो आणि गॅस वाया घालवतो जे साधं आपल्या लक्षातही येत नाही. जर आपण आपल्या स्वयंपाकाच्या पद्धतीत थोडा बदल केला, तर सिलिंडर 10 ते 15 दिवस जास्त चालू शकतो.


१ ) फ्रिजमधील वस्तू थेट गॅसवर ठेवू नका - फ्रिजमधील वस्तू या गार असतात, ज्या थेट गॅसवर ठेवल्यास गॅसचे अधिक नुकसान होते. दूध, भाजी किंवा पीठ फ्रिजमधून काढल्याबरोबर लगेच गरम करायला ठेवू नका. थंड वस्तू गरम करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. फ्रिजमधील वस्तू काही वेळ बाहेर ठेवा आणि त्या सामान्य तापमानाला आल्यावरच त्या गरम करा.


२) झाकण ठेवून स्वयंपाक करा - स्वयंपाक करताना भाजी करताना भांड्यावर झाकण ठेवल्यास फायदा होतो. भांड्यावर झाकण ठेवल्यास वाफ दाबली जाते आणि या वाफेमुळे अन्न लवकर शिजते आणि सुमारे 20 ते 30 टक्के गॅसची बचत होते.उघड्या भांड्यात स्वयंपाक केल्याने उष्णता हवेत निघून जाते आणि अन्न शिजायला वेळ लागतो.


३) प्रेशर कुकरचा वापर करा - प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवणे हा गॅस वाचवण्याचा सर्वात प्रभावी आणि उत्तम मार्ग आहे. डाळ, तांदूळ किंवा भाज्या कुकरमध्ये शिजवल्याने वेळ आणि इंधन दोन्ही वाचते.


४) बर्नरची स्वच्छता - तुमच्या गॅसची Flame पिवळ्या रंगाची दिसत असेल, तर याचा अर्थ बर्नरमध्ये कचरा अडकला आहे. पिवळी ज्योत जास्त गॅस खर्च करते. नियमितपणे बर्नर स्वच्छ करा जेणेकरून निळी आणि तीव्र ज्योत मिळेल.


५) तयारी आधी करा, गॅस नंतर पेटवा - बऱ्याचदा आपण गॅसवर कढई किंवा पातेले ठेवतो आणि मग भाजी चिरणे किंवा मसाला शोधणे सुरू करतो. यामुळे गॅस विनाकारण वाया जातो. नेहमी स्वयंपाकाची सर्व तयारी (भाजी चिरणे, मसाला तयार ठेवणे) आधी करून ठेवा आणि मगच गॅस पेटवा.


६) पाण्याचा वापर मर्यादित ठेवा - जास्त पाणी टाकल्याने ते आटवण्यासाठी जास्त गॅस खर्च होतो. त्यामुळे आवश्यक असेल तितकेच पाणी वापरा. डाळी किंवा कडधान्ये शिजवण्यापूर्वी किमान 1-2 तास पाण्यात भिजत घातल्यास ते लवकर शिजतात.


७) भांड्यांचा आकार आणि प्रकार - नेहमी बर्नरच्या आकारानुसार भांडी निवडा. लहान बर्नरवर मोठे भांडे ठेवल्यास कडांमधून उष्णता वाया जाते. तसेच, जाड तळाची भांडी वापरल्याने उष्णता जास्त वेळ टिकून राहते.

Comments
Add Comment

नवरा-बायको दोघेही कमावतात, तरी बचत शून्य? ‘या’ ४ चुका ठरतात कारणीभूत!

घरात नवरा बायको दोघेही कामाला जातायंत पण तरीदेखील महिन्याच्या शेवटी बचत होत नाहीय? याचं कारण फक्त जास्त खर्च

Legal Will: मृत्यूपत्र कसे बनवायचे? किती खर्च येतो, काय आहेत नियम? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप...

मुंबई: सध्याच्या घडीला माणसाचा एका मिनिटाचाही भरोसा नाही. आयुष्यात काय अनपेक्षित घडेल हे कोणालाच माहीत नाही.

लग्नाच्या आधी की लग्नानंतर? Term Insurance केव्हा घ्यायचा! 99.9% लोकांना माहितीच नाही; आत्ताच जाणून घ्या

मुंबई: लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये आपण कपडे, दागिने, लग्नाचे ठिकाण, लग्नामध्ये जेवणासाठी कोणकोणता मेन्यू हवा आणि

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Phone Call Anxiety : फोन कॉल आला की वाढते धडधड? जाणून घ्या 'टेलिफोन अँग्झायटी'मागचं नेमकं कारण

फोन वाजला की स्क्रीनवरील नाव बघून अनेक जणांच्या मनात पहिल

खुशखबर! Amazon आणि Flipkart वर फेस्टिव्ह सेल सुरू; कार्ड ऑफर्सचा वापर करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी!

सध्या सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे Amazon आणि Flipkart या दोन्ही प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या फेस्टिव्ह सेलचे