Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी


- पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु करण्याची केली मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मालाड पश्चिममधील नेमाणी शालेय इमारत ही धोकादायक झाली असून या शाळेतील स्लॅब काही दिवसांपूर्वी शिक्षकाच्या अंगावर पडले होते. त्यामुळे भविष्यात या शाळेत अन्य कुठली दुघर्टना घडली जावी अशी प्रशासनाची इच्छा आहे का असा संतप्त सवाल करत भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी ही शाळा बंद करून या शाळेतील मुलांना नव्याने बांधण्यात आलेल्या लिबर्टी गार्डन येथील शालेय इमारतींमध्ये स्थलांतरीत करावे अशी मागणी शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली.


मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकी मालाड मधील भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे मालाड पश्चिम एस व्ही रोडवरील धोकादायक झालेल्या नेमाणी शालेय इमारतीबाबत समितीचे आणि पर्यायाने शालेय प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या हरकतीच्या मुद्दयावर बोलतांना योगिता कोळी यांनी नेमाणी शालेय इमारत धोकादायक बनली आहे, अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. एवढेच काय काही दिवसांपूर्वी वर्गात शिकवत असलेल्या शिक्षकाच्या अंगावर स्लॅबचा काही भाग कोसळला, सुदैवाने शिक्षक वाचले. पण या घटनेनंतर मुलांमध्ये आणि पर्यायाने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. या शाळेचा कोणताही भाग केव्हाही कोसळू शकतो.. ही इमारत धोकादायक असून सन २०२७ पासून आपण दुरुस्तीसाठी प्रयत्न करत होतो, परंतु याची दुरुस्तीही न झाल्यामुळे ही वास्तू आता अतिधोकादायक बनली आहे. त्यामुळे ही शालेय इमारत तोडून नव्याने बांधण्याची मागणी कोळी यांनी केली आहे.



मात्र, ही शाळा तोडल्यानंतर या शाळेच्या विद्यार्थ्यांना लांब पर्यायी शाळेत पाठवण्याची गरज भासणार नाही. आपल्या शिक्षण विभागाच्यावतीने लिबर्टी गार्डन येथील शालेय इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले. या शालेय इमारतीत नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करताना त्याठिकाणी नेमाणी शाळेतील मुलांसाठी वर्ग उपलब्ध होती. ही लिबर्टी गार्डन शाळा आणि नेमाणी शाळा यामध्ये जास्त अंतर नसून अर्धा किलोमीटरच्या अंतरावरच या शाळा असून नेमाणी शाळेतील मुलांच्या पालकांची तसेच विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्यामुळे भविष्यात नेमाणी शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेवून ही अतिधोकादायक झालेली शाळा त्वरीत बंद करून लिबर्टी गार्डन येथील शाळेमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली. यावर शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी याची विस्तृत माहिती घेवून योग्य ती कार्यवाही होत नाही तोवर हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात येत असल्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म