Nashik : मोठी बातमी ! डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गंभीर लिफ़्ट दुर्घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये ( Dr. Vasantrao Pawar Medical College) आज (सोमवार) दुपारी १२ वाजेच्या सुमारास लिफ्ट कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या झालेल्या लिफ्ट अपघातात (Lift Accident) एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात ज्योती शिवाजी आहिरे (५०, रा. मानेनगर, अमृतधाम) या गंभीर जखमी झाल्या आहेत. ज्योती आहिरे या मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या मजल्यावर साफसफाईचे काम करत होत्या. ऑपरेशन थिएटरमधील साहित्य ने आण करण्यासाठी एका लिफ्टचा (Lift) वापर केला जातो. नियमानुसार या लिफ्टमधून मानवी वाहतूक होत नाही.





डोके आणि मणक्याला गंभीर दुखापत


मात्र आहिरे यांना लिफ्टचा दरवाजा उघडा दिसला. कुतूहलापोटी त्या लिफ्टच्या मोकळ्या जागेत डोकावून पाहत असतानाच वरच्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली आली. वरतून आलेल्या लिफ्टचा तडाखा बसल्याने ज्योती आहिरे यांचे डोके आणि मान लिफ्टमध्ये अडकली. या भीषण दुर्घटनेत (Lift Accident) त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर रक्तदाब देखील (बीपी) मोठ्या प्रमाणावर खालावला आहे.


घटनास्थळावर रक्ताचा सडा अन लेकाचा आक्रोश


या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलाने रुग्णालयाकडे धाव घेतली. घटनास्थळावरील रक्ताचा सडा आणि आईची अवस्था पाहून मुलाने केलेला आक्रोश
हा काळीज चिरणारा होता. या गंभीर घटनेनंतर मेडिकल कॉलेज प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे.


लिफ्टचा दरवाजा उघडा कसा राहिला आणि तांत्रिक बिघाड होता का, याची तपासणी आता केली जात आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकरोड येथील जेलरोड (Jail Road Area) परिसरात देखील अशीच लिफ़्ट दुर्घटना (Lift Accident) घडली होती त्यामुळे शहरातील लिफ्ट सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''