Ashok Kharat : भोंदू खरातच्या कार्यालयात मिळाल्या महिलांच्या नावाने चेक आणि अंगठीच्या रिंगा

सिन्नर मध्ये रूपाली चाकणकरांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक


नाशिक :  भोंदू बाबा अशोक खरात याच्या कार्यालयाची झडती घेतली असता कार्यालयामध्ये 36 प्रकारच्या वेगवेगळ्या अंगठीच्या रिंगा सापडल्या असून काही महिलांच्या नावाने चेक देखील सापडले आहेत दरम्यान दुसरीकडे या सर्व प्रकरणांमध्ये अडकल्यामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या रूपाली चाकणकर या पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे.


नाशिक शहरातील अनेक महिलांवार दैवी शक्तीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करुन बलात्कार केल्याची घटना समोर आली होती . त्यानंतर खरातचे अनेक महिलांसोबतचे व्हिडीओ व्हायरल झाले. दरम्यान, अशोक खरातचे राजकीय कनेक्शन देखील समोर आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांचे देखील खरात सोबतचे फोटो व्हायरल झाले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने स्वतंत्र महिला आयपीएस अधिकारी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस तपास पथकाची म्हणजे एसआयटीची स्थापना केली आहे. एसटीच्या माध्यमातून त्याचा तपास सुरू आहे. आत्तापर्यंत सहा गुन्ह्यांमध्ये तपास पूर्ण करण्यात आला आहे. सातवा गुन्ह्यामध्ये तपास सुरू आहे.



गुन्हाचा तपास करत असताना पुन्हा एकदा विशेष पोलीस पथकाने खरात यांच्या कार्यालयाची झडती घेतली. या झडती मध्ये पुन्हा एकदा आक्षेपार या गोष्टी मिळाल्या असून यामध्ये महिलांच्या नावाने असलेले चेक मिळालेले आहेत तसेच विविध प्रकारच्या अंगठ्या बनविण्यासाठी 36 प्रकारच्या रिंगा असलेला सेट देखील मिळाला असून या सर्व गोष्टींचा वापर कशासाठी होत होता याची चौकशी आता सुरू झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भोंदू बाबा खरात याच्या समोरील अडचणी वाढू लागलेल्या आहेत.



दरम्यान दुसरीकडे या सर्व प्रकरणांमध्ये अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राज्य महिला अध्यक्ष आणि माझी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या सर्वसाधारण सव्वा महिन्याच्या अंतरानंतर परत एकदा राजकारणामध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झाल्याचे समोर आलेले आहे त्यांनी सिन्नर येथील नांदूर या गावी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यांच्याशी चर्चा केली विचार विनिमय केला याबाबतचे फोटो देखील त्यांनी आपल्या सोशल मीडिया मधून व्हायरल केले आहेत त्यामुळे रूपाली चाकणकर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे समोर आलेले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी