Criminal Public Representatives : गुन्हेगार लोकप्रतिनिधींना सन्मानाची गरज नाही!

मुंबई : विधानमंडळ किंवा संसदेचे सदस्य (आमदार, खासदार) शासकीय कार्यालयात आल्यावर त्यांना उभे राहून अभिवादन करण्याचा प्रघात असला, तरी आता गुन्हेगारी प्रकरणातील आरोपी किंवा निवडणूक प्रक्रियेसाठी आलेल्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीत हा शिष्टाचार पाळण्याची आवश्यकता नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा प्रसंगी संबंधित लोकप्रतिनिधींना कोणताही विशेष दर्जा न देता सामान्य नागरिकांप्रमाणेच वागणूक देण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केले.


राज्य सरकारने १५ एप्रिल रोजी जारी केलेल्या शुद्धीपत्रकानुसार, लोकप्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या सन्मान आणि सौजन्याच्या वागणुकीबाबतच्या नियमावलीत (प्रोटोकॉल) सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार, लोकप्रतिनिधी भेटायला आल्यावर किंवा भेट संपवून परत जाताना अधिकाऱ्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन करणे अनिवार्य होते. मात्र, आता काही विशेष परिस्थितींमध्ये यातून सवलत देण्यात आली आहे.

या प्रसंगी 'सन्मान' नको...


नव्या निर्णयानुसार, जर एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी किंवा अन्य प्रकरणात दोषी ठरला असल्यास, एखाद्या प्रकरणाच्या चौकशीसाठी किंवा सुनावणीसाठी पक्षकार म्हणून बोलावले असल्यास, निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने (नामनिर्देशन अर्ज सादर करणे, छाननी किंवा सुनावणी) कार्यालयात आले असल्यास अधिकाऱ्यांना उभे राहून त्यांचे स्वागत करण्याची आवश्यकता नाही.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक