MLC Election : विधान परिषदेसाठी भाजपची १४ नावांची सुधारित यादी दिल्लीला

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये घडामोडींना वेग आला आहे. प्रदेश कोअर कमिटीने पाठवलेली ३० नावांची लांबलचक यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी नाकारल्यानंतर, आता भाजपने १४ नावांची सुधारित आणि छोटी यादी केंद्राकडे पाठवली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई वगळता राज्यातील पाच विभागांतील संघटनात्मक आणि जातीय समीकरणे साधणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचे संकेत आहेत.


विधान परिषदेच्या नऊ नियमित आणि एका पोटनिवडणुकीच्या जागांपैकी भाजपच्या वाट्याला ६ जागा येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने सुरुवातीला ३० नावांची यादी पाठवण्यात आली होती. मात्र, निम्मी नावे कापून सुधारित यादी पाठवा, असा संदेश दिल्लीतून आल्याने १४ नावे निश्चित करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यादी दिल्लीला पाठवून दिली आहे. उमेदवारी न मिळाल्यास होणारे 'नाराजीनाट्य' टाळण्यासाठी भाजप अर्जाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३० एप्रिल रोजीच अधिकृत यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.


पराभूत नेत्यांना तूर्तास 'नो एन्ट्री'


पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना विधान परिषदेवर पाठवायचे नाही, असे धोरण भाजपने स्वीकारले आहे. त्याऐवजी संघटनेत दीर्घकाळ काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या शर्यतीत प्रामुख्याने डॉ. उपेंद्र कोठेकर, माधवी नाईक, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. विवेक कोल्हे, जगदीश मुळीक आणि अर्चना पाटील चाकूरकर यांच्या नावांचीही चाचपणी सुरू आहे. राजकीय गणिते आणि जातीय समतोल साधताना भाजप कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार, याकडे आता राज्यातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील बैठकीनंतर पुढील काही तासांत पाच नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


महायुती आणि मविआमध्ये अद्याप 'वेट अँड वॉच'


अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही महायुती किंवा महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. संख्याबळानुसार महायुतीला नऊ तर मविआला एक मिळेल. त्यात भाजप ५, शिवसेनेला (शिंदे गट) २ आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) एका जागेचा समावेश आहे. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीच्या जागेवर त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

Unknown Calls Block Scheme : खूशखबर! फसव्या कॉल्सची आता खैर नाही; केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

नवी दिल्ली : अनोळखी (Unknown) नंबरवरून येणारे फेक कॉल्स आणि सायबर फसवणुकीच्या त्रासाला आता कंटाळलात का? तर तुमच्यासाठी

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या