Navi Mumbai Mahapalika : महापालिका शाळेतील मुलींना ‘गुड टच, बॅड टच‘ तसेच सेल्फ डिफेन्सचे शिक्षणं द्यावे

युवा सेनेचे जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी


नवी मुंबई : महापालिका शाळेतील मुलींना इयत्ता पहिलीपासूनच ‘गुड टच व बॅड टच’चे शिक्षण देणेबाबत तसेच मुलींना सेल्फ डिफेन्सचे मोफत प्रशिक्षण देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा युवा सेना सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.



अन्य महापालिका शाळांतील विद्यार्थी संख्या घटत असताना आपल्या महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे. शिक्षणाचा दर्जा व सुविधाही खासगी शाळांच्या धर्तीवर आहेत, हे कोणीही नाकारु शकणार नाही. तथापि महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शीलाच्या रक्षणाचीही जबाबदारी आपली आहे. या मुलींवर अत्याचार अथवा विनयभंग तसेच अन्य कोणत्याही वाईट कुकर्मांना सामोरे जावे लागू नये यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे. शाळेतील मुलींना इयत्ता पहिलीपासून शिक्षणासोबत ‘गुड टच, बॅड टच’ या स्पर्शाविषयीचे आकलन होणे आवश्यक आहे. संपर्कात येणाऱ्या व्यक्तिची भावना आहे, त्याच्या मनात कोणता हेतू आहे, याचे आकलन स्पर्शातूनच मुलींना माहिती होण्यासाठी इयत्ता पहिलीपासूनच मुलींना ‘गुड टच व बॅड टच’चे शिक्षण मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘गुड टच – बॅड टच’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर नियमित व सुसंगत शिक्षण देण्याची गरज आहे.आजच्या काळात मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत लहान वयातच मुलींना योग्य आणि अयोग्य स्पर्श याबाबत जागरूक करणे अत्यावश्यक आहे. यामुळे त्या स्वतःचे संरक्षण करू शकतील तसेच अशा घटना घडल्यास धाडसाने त्याची माहिती पालक व शिक्षकांना देऊ शकतील. यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन सर्व महापालिका शाळांमध्ये ‘गुड टच – बॅड टच’ विषयावर तज्ज्ञांमार्फत कार्यशाळा आयोजित कराव्यात.



विद्यार्थिनींना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन व प्रात्यक्षिके देण्यात यावीत.


शिक्षकांनाही या विषयाचे प्रशिक्षण देण्यात यावे, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतील. पालकांसाठीही जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. शाळांमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी सुरक्षित व गोपनीय यंत्रणा उभी करण्यात यावी. वरिल उपाययोजना महापालिका प्रशासनाने करुन दिल्यास त्यांना शालेय वयात अत्याचाराच्या संभाव्य घटनांपासून बचाव करता येईल व आत्मविश्वासाने शिक्षण घेता येईल. याशिवाय मुलींना स्वत:चे रक्षण करता यावे यासाठी त्यांना सेल्फ डिफेन्सचेही शिक्षण देण्यात यावे, ज्यायोगे त्या योग्य प्रतिकार करुन नराधमांना धडा शिकवतील व स्वत:चे रक्षणही करतील. समस्येचे गांभीर्य व मुलींच्या हितासाठी आपण लवकरात लवकरात या शिक्षण मार्गदर्शनाबाबत संबंधितांना मार्गदर्शन करावे. समस्येचे गांभीर्य व मुलींच्या हितासाठी लवकरात लवकरात या शिक्षण मार्गदर्शनाबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Comments
Add Comment

Shivsena News: शिवसेनेचे ऑपरेशन 'टायगर-४' लवकरच!

आमदार मुरजी पटेल यांचा दावा; ‘ग्रीन सिग्नल’ मिळताच मोहीम फत्ते होणार मुंबई: "उबाठा गटाचे २० पैकी १४ आमदार सध्या

Ganeshotsav ST BUS: गणेशोत्सवात गावी जायचं तिकिट कन्फर्म झालं का? उपमुख्यमंत्र्यांनी केली मोफत बससेवेची घोषणा; वाचा सविस्तर

ठाणे: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता चाकरमान्यांचे पाऊलं आपल्या गावी वळताना

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा करिअरमधून ब्रेक ! आता स्टार्टअपसाठी चाहत्यांकडे मागितल्या भन्नाट आयडिया

Abhinay Berde : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा मुलगा आणि अभिनेता अभिनय बेर्डे सध्या एका वेगळ्याच

Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या दोन दिवसांत ६० कोटींचा टप्पा पार

मुंबई : लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘मिर्झापूर: द

Ganpati Bappa Naivedya : बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवा उकडीचे मोदक; जाणून घ्या सोपी रेसिपी

गणेशोत्सवात श्री गणेशाला दाखवला जाणारा सर्वात प्रिय नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. बाप्पाच्या आगमनाला सुवासिक

Skin Care : बीटाच्या फेसपॅकनं त्वचेला मिळेल पोषण, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक; घरीच बनवा हे फेसपॅक

बीटा मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे त्वचेला आतून पोषण