Mumbai News : कामाठीपुरातील ७० अनधिकृत फेरीवाले व जुने भंगार विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील विविध ठिकाणांवरील सुमारे ७० अनधिकृत फेरीवाले व जुने भंगार विक्रेत्यांवर मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाकडून मंगळवारी २८ एप्रिल २०२६ रोजी कारवाई करण्यात आली.


मुंबई महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ-१) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (ई विभाग) आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई हाती घेण्यात आली होती. कामाठीपुरा गल्ली क्रमांक १ ते १५, शुक्लाजी स्ट्रिट, शंकर पुपाला मार्ग, सिद्धार्थ नगर, बाप्टी मार्ग येथील सुमारे ७० अनधिकृत फेरीवाले व जुने भंगार विक्रेत्यांचा या कारवाईत समावेश आहे. अतिक्रमण निर्मूलनाची ०५ वाहने, ०१ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे निष्कासन करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे १५ अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.

Comments
Add Comment

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना