Kolhapur Crime : कोल्हापूर प्रकरणाला नवं वळण; १५ मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी आणखी एका गुन्हेगाराला अटक

कोल्हापूर : अमरावती परतवाडा येथील घटनेने महाराष्ट्र हादरला आहे, तशीच पुनरावृत्ती कोल्हापूरमध्ये झाली आहे. एका पीडित तरुणीवर दोन मुलांनी अत्याचार केल्याची बातमी पसरली होती. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी देखील पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.



नेमकं घडलं तरी काय?


अमरावती सारखाच प्रसंग कोल्हापुरातही झाला आहे. कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात आरोपी शाहिद समीर सनदे ( वय २२ ) याने तब्बल १५ पेक्षा अधिक तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढून फसवून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
१५ मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे वेगवेगळ्या लॉजवर नेऊन त्यांचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडित मुलींवर अनेक वेळा अत्याचार केले आहेत.



आणखी एका तरुणाला अटक


या प्रकरणात आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली असून तपास अधिक खोल जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात शाहिदची साथ देणारा शाहरुख याला देखील कोल्हापूर पोलिसांनी साताऱ्यातील कराडमधून ताब्यात घेतलं आहे.


9/watermelon-death-case-four-members-of-the-same-family-die-after-eating-watermelon-shopkeeper-reveals-the-truth/

शाहरुख देसाईवर याआधीही अनेक गुन्हे दाखल


शाहरुख आणि शाहिद हे वासनेच्या आहारी गेलेले एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. शाहरुख देसाई याने देखील २०२२ मध्ये एका महिलेवर अत्याचार केला होता याप्रकरणी अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.



गावकऱ्यांनी घराला वाळीत टाकलाय


गावात ही बातमी समजताच ग्रामपंचायतीने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या घराला वाळीत टाकल आहे. घरातील पाणी, वीज, बंद केलं आहे. २० वर्षीय पीडितेच्या तक्रारीच्या आधारे राजारामपुरी पोलिसांनी शाहिदला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने